न्यूयॉर्क : अमेरिकेत एका महिलेला दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली त्याचे कारण म्हणजे ती गेल्या मार्च महिन्यात एका सुपरमार्केटमध्ये शिंकली आणि तेथे ठेवलेल्या सामानावर थुंकली होती. तिने त्यानंतर मी कोरोना पॉझिटिव्ह आहे असे ओरडायला सुरूवात केली. शेवटी ती म्हणाली की ही सगळी थट्टा होती.
मार्गेरेट एन सिरको (३७) असे तिचे नाव असून ती गेरिटी सुपरमार्केटमध्ये शिरली व तेथे तिने शिंकायला सुरुवात केली. ती त्यावेळी नशेत होती. ती म्हणत होती की, सगळ्यांना कोरोना होईल व सगळे मरून जातील. पोलिसांनी तिला अटक केली. तिला दोन वर्षांचा तुरूंगवास आणि त्यानंतर ८ वर्षांच्या प्रोबेशनची शिक्षा सुनावली गेली.
नुकसान किती...
मार्गेरेटच्या या वर्तनामुळे सुपरमार्केटला ३५ हजार डॉलर्सचे खाद्य पदार्थ फेकून द्यावे लागले. याशिवाय सुपरमार्केटमध्ये असलेले ग्राहक आणि सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्यांत मोठ्या दहशतीचे वातावरण होते. मार्गेरेटचे या वर्तनाबद्दल सुपरमार्केटचे मालक जोए फासुला यांनी फेसबुकवर पोस्टही शेअर केली होती.