जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात शिंजो आबे यांचा मृत्यू झाला. शिंजो आबे यांच्यावर हा प्राणघातक हल्ला जपानच्या नारा शहरात झाला. त्यांना दोन गोळ्या लागल्यानंतर ते जमिनीवर पडले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कोण होते जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे? जाणून घेऊया, त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
राजकीय घराण्याशी संबंधशिंजो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी जपानमधील टोकियो येथे झाला होता. ते जपानच्या प्रभावशाली राजकीय घराण्यातील होते. त्यांचे वडील सिंतारो आबे हे जपानचे खूप लोकप्रिय नेते होते. तसेच, त्यांचे आजोबा नोबोसुके किशी जपानचे पंतप्रधान होते. तर शिंजो आबे यांनी नेओसाका येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी साइकेई विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिंजो आबे हे अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांनी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
राजकारणात येण्यापूर्वी स्टील प्लांटमध्ये नोकरी शिंजो आबे यांनी राजकारणात येण्यापूर्वी दोन वर्षे कोबे स्टील प्लांटमध्ये नोकरी केली. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून परतलेल्या शिंजो आबे यांनी दोन वर्षे काबे स्टील प्लांटमध्ये काम केले. स्टील प्लांटमध्ये दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
सर्वात तरुण पंतप्रधानशिंजो आबे यांच्या वडिलांचे 1993 मध्ये निधन झाले, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली. यानंतर शिंजो आबे यांची लोकप्रियता वाढतच गेली. 2006 मध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते शिंजो आबे यांची वयाच्या 52 व्या वर्षी जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाली. जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याशिवाय, शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले होते.
प्रकृती अस्वस्थतेमुळे पंतप्रधानपदाचा दिला होता राजीनामा67 वर्षीय शिंजो आबे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते. ते सलग 7 वर्षे सहा महिने जपानचे पंतप्रधान राहिले होते. पण आतड्याच्या आजारामुळे शिंजो आबे यांनी 2014 साली पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
किती आहे संपत्ती ?फोर्ब्सच्या अहवालानुसार शिंजो आबे यांची एकूण संपत्ती $10 मिलियन आहे. टोकियोमध्ये त्यांची अनेक घरे आणि जमीन आहे. परदेशातही काही मालमत्ता आहेत. ज्यांची माहिती मिळू शकली नाही. शिंजो आबे यांनी जपानच्या राजकारणाबरोबरच अर्थव्यवस्थेलाही नवा रंग दिला. शिंजो आबे यांच्या आर्थिक धोरणांनी 'आबेनॉमिक्स' या नव्या शब्दाला जन्म दिला. याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतातील आर्थिक धोरणांना 'मोदीनॉमिक्स' असे नाव देण्यात आले.