जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती. या हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगाही दिसत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे.प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या हिंसाचाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या हिंसाचारादरम्यान यात भारताचा तिरंगाही दिसत आहे. यावरून प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला. "ज्यानं कोणी यादरम्यान तिरंगा फडकावला होता त्याला लाज वाटली पाहिजे. दुसऱ्या देशांमध्ये होणाऱ्या अशा हिंसाचारामध्ये आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये आमच्या देशाचा तिरंहा वापरू नका," असं म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला.
"... लाज वाटायला हवी," अमेरिकेतील हिंसक आंदोलनादरम्यान तिरंगा दिसल्यानं शिवसेना खासदाराचा संताप
By जयदीप दाभोळकर | Published: January 08, 2021 11:51 AM
संसेदेतील हिंसाचारादरम्यान भारताचा तिरंगा फडकावल्याचाही व्हिडीओ झाला होता व्हायरल
ठळक मुद्देट्रम्प समर्थकांनी गुरूवारी अमेरिकेच्या संसदेत घडवला होता हिंसाचारव्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारताचा तिरंगाही दिसत होता.