आपल्यापेक्षा शेजाऱ्याची भरभराट होत असेल तर ते अनेकांना बघवत नाही. आपल्या आसपासही अशी अनेक उदाहरणे असतील. मात्र काही जण या द्वेशातून असं काही करतात, ज्यामुळे इतरांच्या जीवावर बेतू शकतं. हल्लीच चीनमधील झेंजियांग प्रांतामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदाराच्या मनात शेजारच्या महिला दुकानदाराबाबत प्रचंड द्वेष निर्मणा झाला. या महिला दुकानदाराच्या दुकानात प्रमाणापेक्षा अधिक ग्राहक येऊ लागले होते. त्यामुळे या दुकानदारांने तिच्या दुकानात ग्राहक येऊ नयेत म्हणून भयानक पाऊल उचलले.
एके दिवशी जेव्हा शेजारच्या दुकानामध्ये ली नावाची व्यक्ती आली. त्यांनी रोल्ड मीट केक खरेदी करून खाल्ला. तेव्हा त्याची प्रकृती बिघडली. पाहता पाहता तिथे खाण्यासाठी आलेल्या सुमारे ९ लोकांसोबत असंच घडलं. त्यांनाही उलट्या झाल्या आणि ते बेशुद्ध होऊन पडले.
भोजनात विष असल्याचा संशय आल्याने, ली ने पोलिसांना फोन केला. त्यानंतर तेथील भोजनामध्ये सोडियम नायट्रेड टाकले असल्याचे दिसून आले. हे एक इंडस्ट्रियल रसायन आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, उलटी आणि बेशुद्ध पडणे यासारखी लक्षणे दिसतात. काही घटनांमध्ये मृत्यूही ओढवू शकतो. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच हे कृत्य बाजूला दुकान असलेल्या व्यक्तीने केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.