ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 20 - चीन शक्तिशाली देशांमधला एक देश म्हणून गणला जातो. टेक्नॉलॉजीमध्ये चीन नेहमीच एक पाऊल पुढे असतो. मात्र याच चीनवर चोरांना पकडण्यासाठी टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची नामुष्की ओढावली आहे. खरं तर चीनमध्ये सध्या टॉयलेटमधल्या पेपर चोरांचा सुळसुळाट आहे. चीननं चोरांना पकडण्यासाठी पर्यटनाच्या ठिकाणांवरील टॉयलेटमध्ये गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. टॉयलेटमध्ये बसवण्यात आलेल्या या सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये सेन्सरही लावण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर या कॅमे-यांना यूजर्स फ्रेंडली बनवण्यात आलं आहे. कॅमेरा अशा जागेवर लावण्यात आला आहे की, त्याच्या नजरेतून कोणीही वाचू शकत नाही. बीजिंगमधली सर्वात व्यस्त टुरिस्ट साइट टेंपल ऑफ हेवनच्या टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही अशा प्रकारे बसवण्यात आले आहेत की कोणालाही टिश्यू अथवा टॉयलेट पेपर हवे असल्यास त्यांना कॅमे-यासमोर यावंच लागणार आहे. तुम्ही टिश्यू किंवा टॉयलेट पेपर घेण्यासाठी आल्यावर तो कॅमेरा तुमचा फोटो काढतो. तुमचा फोटो सीसीटीव्ही कॅमे-यात सेव्ह झाल्यानंतर मशिनला टिश्यू पेपर देण्याची कमांड देते. मात्र तुम्ही पुन्हा टिश्यू पेपर मागितल्यास मशिन तुम्हाला तो देणार नाही. चीन सरकारच्या या निर्णयाला जनतेनं विरोध केला आहे. सरकारच्या मते, सार्वजनिक टॉयलेटमध्ये मोठ्या प्रमाणात टॉयलेट पेपर आणि टिश्यू गायब होत आहेत. लोक घरातील वापरासाठी हे टिश्यू पेपर चोरी करतात. नवनवे पेपर रोल मिनिटांमध्ये गायब होत असल्यानं पब्लिक टॉयलेट मॅनेजमेंटवर आर्थिक भार वाढतोय. त्यामुळेच कॅमेरा बसवून अशा लोकांवर नजर ठेवण्यात येत आहे.
धक्कादायक ! चोराला पकडण्यासाठी चीनने टॉयलेटमध्ये लावले सीसीटीव्ही कॅमेरे
By admin | Published: March 20, 2017 4:31 PM