कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे (Coronavirus Pandemic) जगभरातील लोकांची लाइफस्टाईल बदलली आहे. सगळ्यांनाट घरातून निघताना मास्क लावण्याची सवय झाली आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी शक्य ते उपाय करण्यावर लोक जोर देत आहेत. मात्र, अशात एक अशी धक्कादायक बातमी समोर आली की, एका व्यक्तीला मास्क लावून धावणं (Running With Mask) फार महागात पडलं आहे.
रनिंग करताना फप्फुसाला पडलं छिद्र
हेल्थ एक्सपर्ट्सनी अनेकदा सल्ला दिला आहे की, रनिंग किंवा एक्सरसाइज करताना मास्क काढून ठेवला पाहिजे. पण यावर काही लोक विश्वास ठेवत नाहीत. मात्र, आता ही बातमी वाचल्यावर लोक विश्वास ठेवतील. न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, चीनच्या वुहान शहरात २६ वर्षीय तरूण मास्क लावून तीन मैल धावला होता. पण त्याला हे चांगलंच महागात पडलं. मास्क लावून धावल्याने त्याच्या फुप्फुसाला छिद्र पडलं.
पार्कमध्येच बेशुद्ध पडला
तोंडावर मास्क लावून धावल्याने तरूणाच्या फुप्फुसावर अचानक दबाव वाढला आणि तो बेशुद्ध होऊन पार्कमधेच पडला. त्याच्या फुप्फुसातून हवा निघत होती आणि प्रेशर इतकं जास्त वाढलं होतं की, त्याचं हृदय डावीकडून सरकून उजव्या बाजूला आलं होतं. डॉक्टर म्हणाले की, याने फुप्फुसाचं जास्त नुकसान झालं होतं.
श्वास घेण्यास होतो त्रास
डॉक्टर्स म्हणाले की, मास्क लावून रनिंग केल्याने तुमच्या फुप्फुसांवर अतिरिक्त दबाव वाढतो. फुप्फुसाला पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही. मास्क लावून रनिंग केल्याने श्वास घेण्यासाठी फुप्फुसांना क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागतं. फुप्फुसाच्या पंक्चर होण्याच्या स्थितीला न्यूमोथोरॅक्स (Pneumothorax) म्हणतात.