ऑनलाइन लोकमतथायलंड, दि. 25 - येथील एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग करत आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीबरोबर कडाक्याचे भांडण झाल्यानंतर क्रूर पित्याने फेसबुक लाईव्ह समोर मुलीला फासावर लटकले. त्यानंतर स्वत:ही फाशी घेत आत्महत्या केली. थायलंडमधील फुकेट हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. पत्नीबरोबर भांडण झाल्यानंतर त्या नराधमाने मुलीला फासवर लटकले, त्यानंतर तिच्या गळ्यातील दोरी काढून स्वतही फाशी घेतली. हा सर्व प्रकार त्याने फेसबुकवर लाईव्ह केला. बीबीसीच्या वृत्तानुसार, या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आपल्या मुलीच्या गळ्यात रस्सी बांधताना आणि हॉटेलच्या छताला लटकवताना दिसून आला. त्यानंतर त्याने मुलीचा मृतदेह दोरखंडापासून वेगळा केला. त्यानंतर त्या दोरीने स्वत:ला फासी लावून घेतली. त्या व्यक्तीच्या जवळीच्या व्यक्तीने हा प्रकार जेव्हा फेसबुकवर पाहिला त्याने तात्काल पोलिसांना सांगितले. पण पोलीस घटना स्थळावर पोहचेपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. यापूर्वी, न्यूयार्कमध्ये एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूकवर लाईव्ह दाखवण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. सहा नराधमांनी 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार करुन त्याचे फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंगही केलं. धक्कादायक बाब म्हणजे , 15 वर्षाच्या मुलीवर सुरु असलेला अत्याचार 40 जण लाईव्ह पाहत होते मात्र त्यातील एकानेही पोलिसात तक्रार केली नाही.
धक्कादायक!... त्याने मुलीच्या हत्येचे केले फेसबुक Live स्ट्रीमिंग
By admin | Published: April 25, 2017 10:45 PM