अमेरिकेतील न्यू जर्सीच्या जर्सी शहरात एका व्यक्तीने इमारतीच्या ९व्या मजल्यावरून आत्महत्येच्या उद्देशाने खाली उडी मारली. यानंतर तो खाली एका बीएमडब्ल्यू कारवर पडला. इतक्या वरून पडूनही तो सुदैवाने वाचला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, या व्यक्तीचं वय ३१ वर्षे आहे. ही घटना बुधवारी २६ जर्नल स्क्वॉयरमध्ये घडली.
प्रत्यक्षदर्शी स्मिथने सांगितलं की, 'मला एक मोठा धमाका ऐकू आला. आधी मला वाटलं की, हा काही एखादा माणूस पडलेला नाही. त्यानंतर कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या. जी व्यक्ती कारवर पडली ती वेदनेने ओरडत होती. त्याचा एक हात पूर्णपणे वाकडा झाला होता. मी हैराण झाले होते, हे असं वाटत होतं जसा एखाद्या सिनेमाचा सीन आहे'.
स्मिथने लगेच पोलिसांना फोन केला. मिळालेल्या माहितीनुसार, या तरूणाने एका खुल्या खिडकीतून खाली उडी मारली. त्याच्या शरीराच्या काही भागांवर गंभीर जखमा झाला. ही उंची १०० फूटाच्या आसपास होती.
तरूण कारवर पडल्यावर स्वत:हून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. पण लोकांनी त्याची स्थिती बघता त्याला उभं राहू दिलं नाही. जेव्हा पोलीस आणि अॅम्बुलन्स आली तेव्हा तो म्हणत होता की, मला एकटं सोडा. मला मरायचं आहे. याची माहिती तिथे उपस्थित मार्कने दिली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.