लंडन – एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरस(Coronavirus) विषाणूशी लढा देतंय तर दुसरीकडे यूके(UK) मध्ये मांजरांच्या रहस्यमय मृत्यूने चिंता वाढली आहे. संशोधकांनुसार, मांजरांचा मृत्यूमागे त्यांना खाण्यासाठी देण्यात येत असलेल्या पदार्थाचा एक ब्रँड आहे. मागील काही दिवसांपासून मांजरांमध्ये वारंवार Pancytopenia नावाचा आजार आला असून यामुळे मांजरांचा मृत्यू होत आहे.
काय आहे मांजरांच्या मृत्यूचं रहस्य?
मांजरांमध्ये उद्भवणाऱ्या या आजारात व्हाइट ब्लड सेल, प्लेटलेट्स आणि रेड ब्लड सेल खूप वेगाने कमी होत आहेत हेच मांजरांमधील आजाराचं मुख्य कारण आहे. रॉयल वेटनरी कॉलेजच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत ५२८ मांजरांमध्ये अशाप्रकारचा आजार आढळला आहे. या ५२८ मांजरांमध्ये ६३.५ टक्के गंभीर आहेत. इतकचं नाही तर मांजरांच्या मृत्यूचा खरी आकडेवारी रिपोर्टमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा खूप अधिक आहे असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
कॅटफूडमुळे पसरला आजार
अनेक पाळीव मांजरांना त्यांच्या मालकांनी स्थानिक वेटनरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेत. वास्तविक हा आकडा किती मोठा आहे याबद्दल सांगणं कठीण असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हा आजार पूर्ण देशभरात विकल्या जाणाऱ्या कॅट फूड(Cat Food) च्या कारणामुळे झाला असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
वेटनरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले सतर्क
जूनमध्ये उत्पादनकर्त्यांकडून सैन्सबरीचे हाइपोएलर्जेनिक मांजराचा आहार, एप्लाव्स आणि एवीएचे काही पॅक्स पुन्हा परत मागवले होते.परंतु अनेक स्थानिकांना मांजराच्या आहारासाठी आणलेले फूड परत करण्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. वेटनरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पाळीव मांजराच्या उपचारासाठी त्याला इमरजेन्सीमध्ये ठेवण्यास सांगितले आहे.