ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. २ - जर्मनीतील फोक्सवॅगनच्या प्रकल्पात रोबोने एका कर्मचा-याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रोबोत झालेला बिघाड दुरुस्त करत असताना ही घटना घडली असून याप्रकरणी कंपनीने चौकशीचे आदेश दिले आहे.
जर्मनीतील फ्रँकफर्टपासून १०० किलोमीटरवर बोनाटाल येथे फॉक्सवॅगन या ख्यातनाम कार उत्पादक कंपनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात कार तयार करण्याच्या कामात रोबोटचा प्रामुख्याने वापर केला जातो. सोमवारी रात्री या रोबोत झालेले बिघाड दुरुस्ती करण्याचे काम सुरु होते. या दरम्यान रोबोने दुरुस्तीत व्यस्त असलेल्या २२ वर्षाच्या कर्मचा-याला पकडले व दोन मेटल प्लेटच्या मध्ये टाकून दिले. यात चिरडून त्या कर्मचा-याचा मृत्यू झाला. कंपनीने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही मानवीय चूक असल्याचे आढळले असून यात रोबोत कोणतीही समस्या नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चौकशी असल्याचे सांगत कंपनीचे प्रवक्ते इको हिलविग यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.