ब्राझीलमध्ये एका महिलेचा मृत्यू चर्चेचा विषय ठरलेला आहे. एका पाम रीडर/हस्तरेषामुद्रिकाशास्त्रज्ञाने या महिलेच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार फर्नांडा वालोज पिंटो नावाच्या महिलेचा मृत्यू या ज्योतिषाने भेट म्हणून दिलेले चॉकलेट खाल्ल्यानंतर झाला होता. ही विचित्र घटना ब्राझीलमधील मेसियो येथे घडली. हे ठिकाण भविष्य आणि हस्तरेषा वाचणाऱ्यांसाठी कुख्यात आहे.
पिंटो जेव्हा या शहराच्या मध्यावरून जात होती, तेव्हा तिला एका वृद्ध महिलेने थांबवले आणि तिच्या हातावरील रेषा वाचण्यास सुरुवात केली. भविष्य वर्तवताना पिंटोकडे जगण्यासाठी केवळ काही दिवसच उरले असल्याचे सांगितसे. तसेच तिला भेट म्हणून एक चॉकलेट खायला दिले. हे चॉकलेट खाल्ल्यानंतर पिंटोच्या छातीमध्ये अस्वस्थ वाटू लागले.
पिंटो हिची चुलत बहीण बियांका क्रिस्टीना हिने या दुखद घटनेची माहिती देताना सांगितले की, पिंटो हिला उलट्या झाल्या. त्यानंतर तिला अंधुक दिसू लागले. तिचं शरीर नरम होतं, हे सर्व काही तासांतच घडले. तिला देण्यात आलेले चॉकलेट पॅक केलेले होते. त्यामुळे यामधून काही धोका असेल असे तिला वाटले नाही. ती उपाशी होती. त्यामुळे तिने ते खाल्ले.
चॉकलेट खाल्ल्यानंतर पिंटो हिने कुटुंबीयांना मेसेज पाठवून तिला होत असलेल्या त्रासाची कल्पना दिली. तिले लिहिले की, माझं काळीज धडधडतंय, मला उलट्या होत आहेत. माझं तोंड कडू झालंय. मला धुरकट दिसतं. तसेच खूप थकल्यासारखं वाटतंय.
दरम्यान, पिंटो हिच्या मृतहेदाच्या करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून तिच्या शरीरामध्ये सल्फोटेप आणि टेरबुफॉस या कीटकनाशकांचे उच्च प्रमाण सापडले आहे. आता त्या चॉकलेटमधूनच पिंटोच्या शरीरात विष गेले का, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.