पॅरिस - फ्रान्समधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये फ्रान्समधील कॅथोलिक चर्चमध्ये सुमारे ३ लाख ३० हजार मुले लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (sexually abusing in France Church) हा दावा मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका फ्रान्सिसी रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष जीन-मार्क सॉवे यांनी सांगितले की, या रिपोर्टमध्ये पाद्रींसह चर्चमध्ये सहभाग असलेल्या गैर-धार्मिक लोकांकडून करण्यात आलेल्या दुर्व्यवहाराचाही समावेश आहे. (hree lakh accused of sexually abusing three lakh boys and girls from a church in France)
जीन-मार्क सॉवे यांच्या म्हणण्यानुसार ८० टक्के मुलगे लैंगिक शोषणाने पीडित आहेत. त्याशिवाय सुमारे ६० टक्के मुला-मुलींना भावनिक-मानसिक किंवा लैंगिक जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका स्वतंत्र आयोगाने तयार केलेल्या सुमारे अडीच हजार पानांच्या या अहवालामध्ये ७० वर्षांपासून प्रकाशात न आलेल्या रहस्यांचा उलगडा केला आहे.
या रिपोर्टमधून सुमारे अंदाजे तीन हजार जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यापैकी दोन तृतियांश आरोपी हे पाद्री होते. लैंगिक शोषणाच्या काळात ते चर्चमध्ये काम करत होते. सॉवे यांनी सांगितले की, पीडितांच्या एकूण संख्येमध्ये अंदाजे २ लाख १६ हजार लोकांचा समावेश आहे. ते पाद्री आणि अन्य लोकांकडून गैरव्यवहाराची शिकार झाले आहेत. आयोगाने आपला तपास १९५० पासून सुरू केला.
जीन-मार्क सॉवे यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पीडितांबाबतच्या गहिऱ्या आणि क्रूर उदासीनतेच्या रूपामध्ये चर्चच्या भूमिकेवर टीका केली आहे. सॉवे यांनी सांगितले की, २२ कथित गुन्हे ज्यामध्ये आताही खटला पुढे चालवता येऊ शकेल, अशा गुन्ह्यांना अभियोजकांकडे पाठवण्यात आले आहे. तर ४० पेक्षा अधिक गुन्हे जे खटला चालवण्याच्या दृष्टीने खूप जुने आहेत. मात्र आरोपी अद्याप जीवित आहेत. असे गुन्हे चर्च्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.