वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे त्यांच्या सर्वात सुरक्षित विमानाच्या पायऱ्या चढतेवेळी तीनवेळा घसरल्याचा प्रकार घडला आहे. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. (President Joe Biden twice lost his footing while climbing up the steps to Air Force One.)
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे एअर फोर्स वन हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजले जाते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात आलेले तेव्हा या विमानाची खासियत साऱ्यांना समजली होती. आता हे विमान अमेरिकेच्या नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वापरतात. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले की, बायडेन यांचा पाय पायऱ्यांवरून घसरला, परंतू ते 100 टक्के बरे आहेत.
बायडेन पायऱ्यांवरून घसरल्याचा व्हिडीओ वेगाने व्हाय़रल होत आहे. विमानात चढत असताना बायडेन हे घसरले होते. सावरून उठत असताना ते पुन्हा घसरले. त्यांना स्वत:ला सांभाळले आणि पुढे चालू लागले. तर दोन पायऱ्या होत नाही तोच तिसऱ्यांदा पाठीवर पडले. यानंतर उठून ते चालत वर गेले आणि मागे वळून सॅल्यूट केला.
100 टक्के बरे...जो बायडेन हे अटलांटा दौऱ्यावर जाण्यासाठी निघाले होते. तिथे ते आशियाई- अमेरिकी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. व्हाईट हाऊसच्या स्पोक्सवुमन कैरीन जीन यांनी वॉशिंग्टनच्या जॉईंट बेस अँड्र्यूजमध्ये वेगवान वारे वाहत असल्याने ही घटना घडली. कैरीन यांनी सांगितले की, बाहेर खूप वेगाने हवा वाहत होती. यामुळे त्यांचा पाय घसरला असावा.
अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. गेल्य़ा वर्षीच्या सप्टेंबरमध्ये बायडेन यांच्या डाव्या पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले होते. ते त्यांच्या श्वानासोबत खेळत होते. 78 वर्षांच्या बायडेन यांनी 20 जानेवारीला राष्ट्राध्य़क्षपदाची शपथ घेतली होती. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारे सर्वात वृद्ध नेते आहेत.