वॉशिंग्टन : अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्पेसएक्स (SpaceX) कंपनीचे मालक एलन मस्क यांचे मंगळ ग्रहावर जाण्याचे स्वप्न भंगले आहे. स्पेसएक्सचे स्टारशिप रॉकेट बुधवारी टेक्सासच्या समुद्रकिनारी चाचणीवेळी उतरताना आदळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीला वाटत होते की, हेच शक्तीशाली रॉकेट भविष्यात त्यांना मंगळावर घेऊन जाऊ शकेल.
रॉकेट जागेवरच फुटले तरीही स्पेसएक्सने याला खूप चांगली टेस्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच संपूर्ण स्टारशिपच्या टीमचे अभिनंदन केले आहे. एलन मस्क हे टेस्ला कार कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी संपूर्ण इलेक्ट्रीक कार बनविते. अमेरिकेत या इलेक्ट्रीक कारची जोरदार चलती आहे. या घटनेनंतर मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, ''मंगळ ग्रह, आम्ही येत आहोत''. मात्र, नंतर त्यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. रॉकेटने काही यशस्वी चाचण्या केल्या आहेत. स्टारशिप रॉकेटने टेकऑफ केले आणि उड्डाणावेळी आपली स्थितीदेखील बदलली. मात्र, लँडिंगवेळी काही समस्या आली, असे ते म्हणाले.
आम्हाला ज्या गोष्टींची गरज होती ते आकडे आम्ही मिळविले आहेत, असेही त्यांनी म्हटले. बुधवारी रॉकेटने योग्य वेळी उड्डाण केले आणि सरळ रेषेत वर गेले. यावेळी रॉकेटचे आणखी एक इंजिन सुरु झाले. जवळपास ४ मिनिटे ४५ सेकंद हे रॉकेट हवेत होते. तेव्हा तिसरे इंजिनही सुरु झाले. रॉकेटने चांगल्या पद्धतीने उड्डाण केल्याचा दावा केला आहे.
स्टारशिपचे इंजिन लँडिंगच्या काही सेकंद आधीच पुन्हा सुरु करण्यात आले. कारण रॉकेटचा वेग कमी केला जाऊ शकेल. मात्र असे न झाल्याने रॉकेट जमिनीवर आदळले. एलन मस्क प्रकाशाच्या वेगाने जाणारे रॉकेट बनवू इच्छीत आहेत. त्यांना मंगळावर पोहोचायचे आहे. याआधी हे रॉकेटचे परिक्षण अनेकदा टाळण्यात आले होते.