रशियात जंगली अस्वलांनी एका महिलेची शिकार केली. असं मानलं जात आहे की, अस्वलांच्या टोळक्याने महिलेला फाडून खाल्लं. २४ वर्षीय महिला जंगलाजवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये एक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. परत येत असताना रस्ता भरकटली आणि घनदाट जंगलात पोहोचली. तेथून ती परत आली नाही. महिलेने अनेक इमरजन्सी कॉल्स केले. पण बचाव दल तिला शोधण्यात अपयशी ठरले.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, २४ वर्षीय याना बालोबानोवा रस्त भटकून Sverdlovsk च्या जंगलात हरवली. हा भाग जंगली अस्वलांचा गढ मानला जातो. यानाला शोधण्यासाठी प्रशिक्षित श्वानांचा वापर केला गेला. पण ती कुठेही सापडली नाही. बचाव दलाला घटनास्थळी अस्वलांच्या पायांचे ठसे दिसून आले. असं मानलं जात आहे की, यानाला अस्वलांनी मारून खाल्लं.
याना जंगलाच्या जवळ आयोजित आपल्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीत गेली होती. तिथे तिचं एका पाहुण्यासोबत भांडण झालं. ज्यानंतर घरी जाण्यासाठी ती एकटीच तेथून निघाली. रात्रीच्या अंधारात याना रस्त भरकटून घनदाट जंगलात पोहोचली. तिने मदतीसाठी अनेक कॉल्स केले, पण मदत येईपर्यंत ती गायब झाली होती.
सर्च टीमने साधारण एक महिन्यापर्यंत याना बालोबानोवाचा शोध घेतला. पण त्यांना काही यश मिळालं नाही. त्यामुळे मानलं जात आहे की, महिलेला अस्वलांच्या टोळक्याने मारलं असावं. वाइल्ड लाइफ इन्स्पेक्टर आंद्रेई साकुलिन म्हणाले की, 'याना जिवंत असण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. जंगलात अनेक खतरनाक अस्वलं आहेत आणि त्यांच्यापासून वाचणं कठिण आहे'. ते म्हणाले की, जंगलात मादा अस्वल आणि पिल्लांचे निशाण मिळाले आहेत. पिल्लांबाबत मादा अस्वल फार प्रोटेक्टिव असते. जर कुणी त्यांच्या मार्गात आलं तर त्यांचा मृत्यू निश्चित असतो.