शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

Shocking! १६० फूट उंचीवर व्हिडीओ बनवत होती महिला, अचानक पाय घसरला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:36 PM

टॉवर क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिचा आधी मृत्यू झाला होता.

सोशल मीडियावर (Social Media) वर अॅक्टिव राहण्याच्या क्रेझने एका चीनी महिलेचा जीव गेलाय. महिला १६० फूट उंचीवर व्हिडीओ बनवत होती. तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. खाली पडत असताना फोन महिलेच्या हातातच होता. टॉवर क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिचा आधी मृत्यू झाला होता.

‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, मृत महिला Xiaoqiumei नावाने सोशल मीडियावर अकाऊंट चालवत होती. ज्यावर ती तिच्या डेली लाइफ आणि विशाल क्रेन ऑपरेटींगशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करत होती. तिने १ लाख फॉलोअर्सही होते. घटनेवेळी उपस्थित लोकांनी सांगितलं की, मृत महिला १६० फूट उंचीवर तिचा व्हिडीओ बनवत होती. तेव्हाच अचानक खाली पडली. (हे पण वाचा : Shocking! बंजी जम्पिंगची इच्छा पडली महागात, एका चुकीमुळे हवेतच झाला तरूणीचा मृत्यू)

२३ वर्षीय महिला दोन मुलांची आई होती. मंगळवारी सायंकाळी जेव्हा जास्तीत जास्त सहकारी साइटवरून निघून गेले होते तेव्हा Xiaoqiumei लाइव्ह व्हिडीओ बनवण्यासाठी क्रेनवर चढली होती आणि यादरम्यान तिचा पाय घसरला. मात्र, परिवाराला हे मान्य नाही. ते म्हणाले की, त्यांची मुलगी तिच्या कामाबाबत फार गंभीर होती आणि ड्युटी दरम्यान व्हिडीओ बनवू शकत नाही. क्रेनहून उतरताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडण्याची शक्यता आहे.

Zhejiang Province च्या Quzhou मध्ये राहणाऱ्या महिलेचं ऑफिस तिच्या घराजवळच होतं. पीडित परिवाराने सांगितलं की, Xiaoqiumei काम करत असताना फोन तिच्या बॅगमध्ये ठेवत होती. त्यामुळे हे शक्य नाही की, व्हिडीओ काढताना ही दुर्घटना झाली असावी. या घटनेमुळे महिलेचे सहकारीही शॉकमध्ये आहेत. त्यांना विश्वास बसत नाहीये की, Xiaoqiumei आता त्यांच्यात नाही. 

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीयAccidentअपघातSocial Mediaसोशल मीडिया