वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून ते तब्बल 10 हजारवेळा खोटे बोलले आहेत. तर पहिला 5 हजारांचा टप्पा गाठताना त्यांना 601 दिवस लागल्याचा दावा अमेरिकी वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. याचाच अर्थ पहिल्या टप्प्यात ट्रम्प दिवसाला 8 वेळा खोटे बोलत होते. तर नंतरच्या दिवसात 23 वेळा खोटे बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करताना खोटे बोलण्याचा 8 हजारांचा आकडा पार केला होता. वॉशिंग्टन पोस्टने 26 एप्रिलपर्यंतची आकडेवारी दिली आहे. तज्ज्ञांच्या मते नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांच्या खोटे बोलण्यामागचे मुख्य कारण आहे. याकाळात त्यांनी मेक्सिको बॉर्डरवरील भिंतीवरून अनेक भ्रम उत्पन्न करणारे दावे केले होते.
प्रचारसभा आणि ट्विटरवर सर्वाधिकट्रम्प यांनी प्रचारसभांमध्ये 22 टक्के खोटे दावे केले आहेत. तसेच ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही बऱ्याचदा खोटे बोलत असतात. 25 ते 27 एप्रिल या काळात त्यांनी 171 वेळा खोटे वक्तव्य केले आहे. यामध्ये जपान, चीन आणि युरोपियन संघटनेबरोबरच्या व्यापारी तोट्यावर खोटे बोलले होते. तसेच टॅक्स प्रणाली आणि ओबामा केअरवरूनही त्यांनी खोटे दावे केलेले आहेत.
सहकारी देशांवरूनही खोटे बोलट्रम्प यांनी सहकारी देशांसोबतच्या संबंधांवरही खोटे बोलण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी सांगितले की अमेरिकेने नाटोवर 100 टक्के खर्च केला. हे वक्तव्य चुकीचे होते. तसेच सौदी अरब आणि अमेरिकेमध्ये 450 अब्ज डॉलरचे व्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. जे संरक्षण तज्ज्ञांनी हाणून पाडले होते.
वॉशिंग्टन पोस्टची करडी नजर वॉशिंग्टन पोस्टने सांगितले की, ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक वक्तव्यावर खरे- खोटे करण्यासाठी नजर ठेवून आहेत. वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांच्या 100 दिवसांच्या कव्हरेजमध्ये ऑनलाईन प्रोजेक्टअंतर्गत फॅक्ट चेक सुरु करण्यात आले. कारण ट्रम्प हे एवढे खोटे बोलत होते, की देशाला त्याबद्दल खरे0खोटे सांगण्याची गरज होती. पहिल्या 100 दिवसांतच ट्रम्प दिवसाला 5 वेळा खोटे बोलत होते.