वॉशिंग्टन : रोजगार आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात लॅटीन अमेरिकेतील देश होंडुरास, ग्वाटेमाल आणि अल सल्वाडोर या देशांतून जवळपास 10 हजार लोक अमेरिकेच्या वाटेवर असून त्यांना रोखण्यासाठी ट्रम्प यांनी थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
मेक्सिकोच्या सीमेवर अमेरिकेने 15 हजार सैनिक तैनात केले आहेत. या स्थलांतर करणाऱ्या लोकांनी दगडफेक केल्यास त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात येणार आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, सैन्य आधी गोळ्या झाडणार नाही. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेल. मात्र, मेक्सिकोसारखी दगडफेक केल्यास मग त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात येतील. दगडफेक आणि गोळ्या झाडण्यामध्ये काही फरक नसल्याचेही त्यांनी सांगितले.