शहरं
Join us  
Trending Stories
1
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
2
शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश
3
"ते उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही"; पृथ्वीराज चव्हाणांचं जागावाटपातील चुकांवर बोट
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कर्नाटकात येऊन गॅरंटीच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याचे आव्हान
6
दुर्मिळातली दुर्मिळ...! पुण्याच्या महिलेने अख्खा टूथ ब्रश गिळला; ऐकून डॉक्टरही शॉक झाले
7
कुणाचं घर तुटता कामा नये, कायद्याचं पालन गरजेचं! बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 
8
ठाकरेंनी समजूत काढली तरी निष्ठावंत प्रचारापासून दूर; मविआमुळे कार्यकर्त्यांची कोंडी
9
Rashami Desai : “मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला अन्...”; १६ व्या वर्षी आला कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव
10
आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ
11
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
12
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
13
₹१० पेक्षा कमी किंमतीच्या Penny Stock वर गुंतवणूकदारांच्या उड्या, Titan सोबत करारानंतर सातत्यानं अपर सर्किट
14
Rahul Gandhi : "प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
15
Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: आज क्लासेन टीम इंडियाला रडवणार? सेंच्युरियनवरील आकडेवारी पाहून येईल 'टेन्शन'
16
"प्रेयसीला मिठी मारणे, चुंबन घेणे गुन्हा नाही"; लैंगिक छळ प्रकरणाची सुनावणी करताना मद्रास उच्चन्यायालयाचा निर्णय
17
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
18
Tulasi Vivah 2024: आजपासून तुलसी विवाहारंभ; जाणून घ्या विधी, मुहूर्त आणि आख्यायिका!
19
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
20
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट

स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट, 2 विद्यार्थ्यांना अटक

By admin | Published: January 28, 2017 7:29 AM

एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 28- अमेरिकेच्या एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. स्वतःच्याच शाळेत गोळीबार करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांचं वय 15 वर्षांपेक्षाही कमी आहे.   मध्य फ्लोरिडामधून त्यांच्या राहत्या घरातून त्यांना अटक करण्यात आली. हत्येचा कट रचल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार,  गेल्या मंगळवारी लेडी लेक शहरातील द व्हिलेज चार्टर मिडल स्कूलमधील काही विद्यार्थ्यांमध्ये 27 जानेवारी रोजी शाळेत मोठ्या प्रमाणात गोळीबार होणार असल्याची चर्चा सुरू असल्याचं पोलिसांना समजलं. 27 जानेवारीला शाळेत येऊ नका गोळीबार होणार आहे असं ते बोलत होते.

याबाबत पोलिसांना आणि शाळा प्रशासनाला माहिती मिळाल्यांनंतर कारवाई करून पोलिसांनी दोघांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यांच्या घरून बंदूकही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.