इस्लामाबाद : भारताने मंगळवारी आमच्या हवाई हद्दीत शिरून केलेल्या हल्ल्याला आम्हीही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकतो, याची चुणूक दाखविण्यासाठी आमच्या हवाई दलाने बुधवारी भारतीय हवाई हद्दीत शिरलो. तेथील लष्करी तळावर हल्ला करणे सहज शक्य असूनही तेटाळून मोकळ्या, निर्जन जागेत हल्ला करून माघार घेतली, अशी बढाई दावा पाकिस्तानने मारली आहे.
पाकिस्तानी सैन्यदलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर म्हणाले की, पाकिस्तान हवाई दलाची विमाने त्यांना नेमून दिलेले मिशन ‘फत्ते’ करून परत आल्यावर, त्याला प्रत्तुत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमाने हवाई हद्दीचा भंग करून पाकिस्तानच्या हद्दीत घुसली. पाकिस्तान हवाई दलाने भारताची त्यापैकी विमाने पाडली. एक विमान आझाद काश्मीरमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) पडले, तर दुसरे जम्मू-काश्मीर पडले.भारताच्या पाडलेल्या विमानांच्या दोन वैमानिकांना त्या ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांनी ताब्यात घेतले. यापैकी एका जखमी वैमानिकास लष्कराच्या कमांड इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असेही पाकिस्तानचा हा प्रवक्ता म्हणाला. या दोघांना आंतरराष्ट्रीय नियमांनुसार वागणूक दिली जाईल, असेही ते म्हणाले.
जनरल गफूर यांच्या पत्रकार परिषदेच्या आधीच पाकिस्तान सरकारने त्यांनी पकडलेल्या एका भारतीय वैमानिकाच्या व्हिडीओ जारी केला. चेहऱ्यावर फडके बांधलेली व्यक्ती, माझे नाव विंग कमांडर अभिनंदन असून, मी भारतीय हवाई दलाचा अधिकारी आहे, असे सांगताना या व्हिडीओत दिसले. संध्याकाळपर्यंत पाकिस्तानने यातही फिरवाफिरवी करत आपल्या ताब्यात भारताचा फक्त एकच वैमानिक असल्याची पलटी खाल्ली. आम्ही मिशन ठरविताना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताची सहा ठिकाणे लक्ष्य म्हणून निश्चित केली होती.ती सर्व लक्ष्ये आमच्या विमानांच्या माऱ्याच्या सहज टप्प्यातही होती, परंतु भारताच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य न करता, आमच्या विमानांनी त्यापासून दूर मोकळ्या जागेवर बॉम्ब टाकले. (वृत्तसंस्था)क्षमता आहे, पण शांतता हवीजनरल गफूर म्हणाले की, प्रतिहल्ला करण्याचा आमचा हक्क आहे, तशी आमची क्षमताही आहे, पण परिस्थिती चिघळविण्याची आमची इच्छा नाही. आमच्यावर वेळच आणली गेली, तर त्यासाठीही आमची तयारी आहे. आपला कांगावा पुढे सुरूठेवताना गफूर म्हणाले की, आम्ही ते स्वसंरक्षणासाठी केले असल्याने, त्यात विजयी झाल्याचा दावा करण्याची आमची इच्छा नाही. शांतता हवी असल्याने कोणतेही नुकसान होणार नाही, असे लक्ष्य आम्ही निवडले.