ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 2- इराक आणि सीरियामध्ये दहशतवादी कृत्यांनी धुमाकूळ घालणा-या इसिसला नवा जिहादी जॉन सापडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनमधला भारतीय वंशाचा सिद्धार्था धर हा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस)चा नवा जिहादी जॉन बनला आहे.
भयंकर घातपात घडवून आणण्यासाठी सिद्धार्था धर सज्ज असल्याचीही माहिती समोर येते आहे. निहाद बराकत या मुलीचं सिद्धार्था धर यानं अपहरण करून तिचा सौदा केल्याची माहिती स्वतः निहाद या मुलीनं दिली आहे. सिद्धार्था हा मोहसूलच्या गटाशी संबंधित आहे. इराकमध्ये हा मोहसूलचा गट सर्वात शक्तिशाली समजला जातो. सिद्धार्था हा भारतीय वंशाचा ब्रिटिश असून, त्यानं आता मुस्लिम धर्म स्वीकारला आहे.
सिद्धार्था सध्या अबू रुमाशा या नावानं वावरत आहे. सिद्धार्थाला 2014ला पत्नी आणि मुलासोबत सीरियाला जात असताना इंग्लंडच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. सिद्धार्था हा फॉरन फायटर होता आणि त्यानं मला गुलाम बनवून ठेवल्याचा खुलासाही बराकत हिनं केला आहे. मला किरकूकजवळ बंदी केल्यानंतर मोहसूलच्या आणखी एका नेत्याशी माझी भेट घडवून आणली. त्याचं नाव अबू धर होतं. त्यानं स्वतःला यझिदी मुलीच्या रुपात परावर्तित केलं होतं. आणि तो नेहमी दुस-या माणसाशी लग्न करणार असल्याचं सांगायचा, अशी माहिती अपहरण झालेल्या निहाद बराकत या मुलीनं दिली आहे. सिद्धार्था धरला इंग्लंडमध्ये जवळपास 6 वेळा अटक करून त्याची जामिनावर सुटका केल्याची माहिती इंग्लंडच्या पोलिसांनी दिली आहे.