शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

दर तिसरा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूचा

By admin | Published: December 13, 2015 1:54 AM

मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करावी या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताशी देशातील दर तिसरी व्यक्ती सहमती व्यक्त करीत असून ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत गेल्या काही दिवसांत

न्यूयॉर्क : मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करावी या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताशी देशातील दर तिसरी व्यक्ती सहमती व्यक्त करीत असून ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. दूरचित्रवाणी नेटवर्क ‘सीबीएस’ने याबाबत केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली. शिवाय देशातील मुस्लिम नागरिकांची माहिती संकलित करून ठेवावी असे मत निम्मे अमेरिकन व्यक्त करीत आहेत. कॅलिफोर्नियातील सन बेर्नाडिनो येथे दोन दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वरील वादग्रस्त विधान केले होते, त्याला माध्यमांमधून जगभर प्रसिद्धी मिळाली व ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले. सीबीएस वाहिनीने रिपब्लिकन, डेमोक्रॅट व इतर नागरिक अशा सुमारे हजारभर लोकांची मते जाणून घेतली. यात बहुतेक जणांनी प्रवेशबंदीच्या विरोधात मत व्यक्त केले. ७३ टक्के डेमोक्रॅट अशाच मताचे आहेत, तर ३८ टक्के रिपब्लिकनांना बंदी घालू नये असे वाटते. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देतील, असे काही रिपब्लिकनांना वाटते. यापैकी ५४ टक्के बंदीच्या बाजूचे आहेत, तर ५१ टक्के जणांना अमेरिका ज्या तत्त्वांवर स्थापन झाली त्याचा भंग वाटतो. आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीचे ट्रम्प कट्टर दावेदार मानले जातात. (वृत्तसंस्था)लज्जास्पद, धोकादायक विधानट्रम्प यांनी वादगस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅ टिक पक्षाच्या दावेदार हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्या विधानावर हसून प्रतिक्रिया दिली. ‘हे लज्जास्पद जसे आहे, तसेच धोकादायक आहे’ असे त्यांनी एबीसी वाहिनीवर सांगितले. मुस्लिमांच्या बचावार्थ पिचाई सरसावलेगुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ट्रम्प यांच्या विधानावर टीका केली. त्यांनी खुले पत्र लिहून मुस्लिामांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपल्या भीतीवर मूल्यांनी मात करायला नको’ असे मत व्यक्त करीत, खुले विचार, सहनशीलता व नव्या अमेरिकनांना स्वीकारणे ही अमेरिकेची सर्वात मोठी ताकत व गुण आहे, असे त्यांनी म्हटले आहे.