शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

जगभरात मानवी शुक्राणूंच्या संख्येत लक्षणीय घट, आयुर्मान कमी होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 7:52 AM

Health News : शुक्राणूंची संख्या केवळ मानवी प्रजनन क्षमतेचेच नव्हे तर पुरुषांच्या चांगल्या आरोग्याचे देखील सूचक आहे. जागतिक पातळीवर केलेल्या पाहणीत मानवी शुक्राणूंचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले आहे.

लंडन : शुक्राणूंची संख्या केवळ मानवी प्रजनन क्षमतेचेच नव्हे तर पुरुषांच्या चांगल्या आरोग्याचे देखील सूचक आहे. जागतिक पातळीवर केलेल्या पाहणीत मानवी शुक्राणूंचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण कमी झाल्याने अंडकोष कॅन्सर आणि आयुर्मान कमी होण्याचा धोका असतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. 

ह्युमन रिप्रोडक्शन अपडेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात ५३ देशांमधील डेटा वापरण्यात आला आहे. त्यामध्ये अतिरिक्त सात वर्षांचा डेटा (२०११-२०१८) समाविष्ट आहे. याआधी पुनरावलोकन न केलेल्या विशेषत: दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या प्रदेशामधील पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा डेटा दर्शवितो की, प्रथमच त्या प्रदेशामधील पुरुषांमध्ये एकूण शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या केंद्रीकरणात लक्षणीय घट पूर्वी उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियात दिसून आली आहे. शुक्राणुंची संख्या आणि केंद्रीकरण यानंतर २००० नंतरची झपाट्याने घट दर्शविण्यात आली आहे. अमेरिकेतील इकान स्कूल ऑफ मेडिसिन, माउंट सिनाई येथील प्रोफेसर शन्ना स्वान यांनी सांगितले की, कमी शुक्राणूंची संख्या केवळ पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरच परिणाम करत नाही, तर पुरुषांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. 

उपाय शोधणे गरजेचेn पुनरुत्पादन आरोग्यास धोका निर्माण करणारे घटक कमी करण्यासाठी तातडीने जागतिक स्तरावर कार्यवाही झाली पाहिजे.n भारतातही वेगळा अभ्यास झाला पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले. तथापि, भारतातील कल वेगळा आहे असे समजण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.४६ वर्षांत वेगाने घट भारतातही ही घट दिसून येत असल्याचे इस्रायलमधील हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक हागेई लेव्हिन यांनी सांगितले. आम्ही गेल्या ४६ वर्षात जागतिक स्तरावर शुक्राणूंच्या संख्येत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट पाहत आहोत. ही घसरण अलीकडच्या वर्षात वेगवान झाली आहे, असे ते सांगतात. सध्याच्या अभ्यासात शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या कारणांचे परीक्षण केले जात नाही. लेव्हिन यांनी अलीकडील केलेले त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. ते दर्शविते की, गर्भधारणा काळात आढळून येणाऱ्या अनेक अडचणींचा संबंध प्रजनन क्षमतेच्या दुर्बलतेशी जोडलेला असतो. याशिवाय, जीवनशैली आणि वातावरणातील रसायने हे गर्भाच्या विकासावर विपरित परिणाम करतात.

टॅग्स :scienceविज्ञानHealthआरोग्य