न्यूयॉर्क : कन्सासमध्ये एका भारतीय इंजिनिअरला गोळ्या घालून ठार मारल्याचे प्रकरण ताजे असतानाच अमेरिकेते एका शीख व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात दीप राय (३९) हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमेरिकी नागरिक दीप राय हे शुक्रवारी वॉशिंग्टन प्रांताच्या केंटमध्ये आपल्या घराबाहेर वाहनाची दुरुस्ती करत होते. याच वेळी चेहरा झाकलेला एक व्यक्ती तिथे आला आणि दीप राय यांच्यावर गोळीबार करुन ‘आपल्या देशात चालते व्हा’असे त्याने सांगितले. केंट पोलिसांनी सांगितले की, या दोघात आधी वाद झाले. त्यानंतर या व्यक्तीने राय यांच्या हाताला गोळी मारली. याबाबत बोलताना विदेश मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक दीप राय यांच्यावर झालेल्या हल्ल्याने मी दु:खी आहे. या व्यक्तीचे वडील सरदार हरपाल सिंह यांच्याशी मी चर्चा केली आहे. सुषमा स्वराज यांनी व्टिट केले आहे की, त्यांनी मला सांगितले की, दीप राय यांच्या हाताला गोळी लागली आहे. आता त्यांची प्रकृती धोक्याच्याबाहेर आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे की, लँकस्टरमध्ये भारतीय वंशाचे हरनिश पटेल यांच्या हत्येमुळेही मी दु:खी आहे. आमच्या वकीलांनी लँकस्टर येथे पटेल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.>कोण होता हल्लेखोर? हल्लेखोराचे नाव समजू शकले नसले तरी, हा गोरा अमेरिकन व्यक्ती होता. त्याची उंची सहा फूट एवढी होती.आपला चेहरा त्याने झाकून घेतला होता. भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राय आता बोलत आहेत. त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.>हल्ल्यांचे सत्र गत आठवड्यात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोटला (३२) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी लँकस्टरमध्ये भारतीय वंशाचे हरनिश पटेल (४३) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि आता दीप राय (३९) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. >बंदी आदेशावर आज ट्रम्प यांची स्वाक्षरी?अमेरिकेत प्रवेशबंदीवरील सुधारीत आदेशावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी स्वाक्षरी करण्याची अपेक्षा आहे. गेल्या २७ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी काढलेल्या अशाच आदेशानंतर अमेरिकेतील विमानतळांवर मोठाच वाद निर्माण झाला होता. देशांतर्गत सुरक्षेच्या मंत्रालयात ट्रम्प या सुधारीत आदेशावर सही करतील, असे वृत्त ‘पोलिटिको’ने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले.सुधारीत आदेशात नेमके कोणते बदल असतील हे स्पष्ट नाही. मूळ आदेशानुसार मुस्लिमबहुल सात देशांतील नागरिकांना ९० दिवस, १२० दिवस निर्वासितांना आणि सिरियाच्या निर्वासितांना कायमची अमेरिका प्रवेशबंदी घालण्यात आलेली आहे.
अमेरिकेत शीख व्यक्तीवर गोळीबार
By admin | Published: March 06, 2017 4:27 AM