शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर नाराज सिंगापुरचं मोठं पाऊल; लागू केला POFMA कायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 11:03 AM

Arvind Kejriwal : केजरीवालांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं म्हणत एस. जयशंकर यांनी फटकारलं. सिंगापूरचं केजरीवालांच्या वक्तव्यानंतर मोठं पाऊल.

ठळक मुद्देकेजरीवालांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं म्हणत एस. जयशंकर यांनी फटकारलं होतं. सिंगापूरचं केजरीवालांच्या वक्तव्यानंतर मोठं पाऊल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून सतर्कताही वाढली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करत सिंगापुरमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे म्हटलं जात असल्याचं सांगितलं. तसेच भारतात हा स्ट्रेन तिसऱ्या लाटेच्या रूपात येऊ शकतो, असंही ते म्हणाले. केजरीवालांच्या या ट्वीटला सिंगापूरच्या दुतावासानं उत्तर देत भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना तलब केलं. मात्र, यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्याच्यावर टीका केली होती. दरम्यान, केंद्राच्या स्पष्टीकरणानंतर सिंगापुरनं संतोष व्यक्त केला होता. परंतु यानंतरही सिंगापुरनं याविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. सिंगापूर सरकारनं अॅन्टी मिसइनफॉर्मेशन अॅक्ट म्हणजे प्रोटेक्शन फ्रॉम ऑनलाईन फॉल्सहुड अँड मॅनिप्युलेशन लॉ (Protection from Online Falsehoods & Manipulation- POFMA) लागू करेला आहे. सिंगापूरमध्ये ऑनलाइन पसरवण्यात आलेल्या बनावट वृत्तांना रोखण्यासाठई हा कायदा आहे. बनावट वृत्त पसरवण्यापासून रोखण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. हा कायदा  सिंगापूरनं थेट केजरीवाल किंवा भारतातील सोशल मीडियाविरोधात लावला नसला तरी सिंगापुरमध्ये खोटं वृत्त पसरण्यापासून रोखण्यासाठी हा कायदा लागू केला आहे. सिंगापूरच्या आरोग्यमंत्रालयानं POFMA कार्यालयाला फेसबुक ट्विटर आणि स्थनिक सोशल मीडिया प्लॅटफटर्म्सना सामान्य सुधारणा संबंधी निर्देश जारी करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ हा कायदा लागू झाल्यानंर फेसबुक, ट्विटर आणि हार्डवेअर झोन डॉट कॉमसमेत सोशल मीडिया कंपन्यांना सिंगापूरमध्ये सर्व एंड युझर्सला करेक्शन करण्यासाठी नोटीस पाठवली जाईल. याचा अर्थ सिंगापूरमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यासंबंधी कोणतीही माहिती दाखवली जाणार नाही. सिंगापूरच्या आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार आता सोशल मीडिया कंपन्यांना सिंगापूर व्हेरिअंटसंबंधीत खोट्या वृत्ताबज्जस एंड युझर्सना एक करेक्शन आणि स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. कोणत्याही प्रकारचं सिंगापूर व्हेरिअंट नाही आणि त्याचा कोणताही पुरावा नाही की तो मुलांसाठी अधिक धोकादायक आहे, हे त्यांना आंता सांगावं लागेल. जयशंकर यांनी सांभाळली बाजू"सिंगापूर आणि भारत दोन्ही देश कोरोनाविरोधातील लढत आहेत. कोरोनाच्या लढाईत भारताला केलेल्या मदतीबाबत सिंगापूरचे आभार. सिंगापूर सैन्याकडून विमानाने भारतात आलेली मदत दोन्ही देशांच्या नाते किती घट्ट आहे, हे दर्शवते. मात्र, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान भारताचं अधिकृत वक्तव्य नाही असं स्पष्ट करू इच्छितो, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत सांगितलं. तसंच दुसरं एक ट्वीट करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवालांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचंतथापि, अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये दोन देशांच्या दीर्घकाळापासून चालत आलेल्या भागीदारी आणि संबंधांवर परिणाम करू शकतात, हे समजायला हवं. दिल्लीचे मुख्यमंत्री भारतासंदर्भात मते मांडू शकत नाही, असं स्पष्ट करतो, या शब्दांत एस. जयशंकर यांनी अरविंद केजरीवाल यांना सुनावलं आहे.  

टॅग्स :singaporeसिंगापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीS. Jaishankarएस. जयशंकर