बीजिंग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक महतीचे औरंगाबाद व चीनमधील डुनहाँग ही भगिनी शहरे (सिस्टर सिटी) होत असल्याची घोषणा केली. बीजिंग येथील स्टेट प्रॉव्हिन्शियल लीडर्स फोरमच्या बैठकीत ते बोलत होते. सिस्टर सिटी प्रकल्पाअंतर्गत भारत व चीनमधील शहरे जोडण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समकक्ष चिनी नेते ली केकियांग यांच्या बैठकीत करण्यात आली. त्याखेरीज ताशी ३०० कि.मी. वेगाच्या क्षमतेची रेल्वे नागपूर-दिल्लीदरम्यान सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेलाही चीनचा हातभार लागणार आहे. डुनहाँग हे चीनमधील ऐतिहासिक शहर असून, पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात आहे. पुरातन काळातील सिल्क रूटवर असणारे ते एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात वाळूच्या टेकड्या असून, विस्तीर्ण जलाशयही आहे. पण शहर ओळखले जाते ते मागाव येथील बुद्ध लेण्यांसाठी. थाऊजंड बुद्ध केव्हज् नावाने प्रसिद्ध असणारी ही लेणी युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केली आहे.
औरंगाबाद व डुनहाँग बनणार सिस्टर सिटीज्
By admin | Published: May 16, 2015 3:57 AM