शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारतेय, मानवाधिकार अहवालात अमेरिकेची कबुली; उईगर मुस्लीमांवरून चीनला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 12:26 PM

मंगळवारी बायडेन प्रशानसनाअंतर्गत अमेरिकेनं आपला पहिला मानवाधिकार अहवाल सादर केला.

ठळक मुद्देचीनमध्ये उईगर मुस्लीमांविरोधात होत असलेल्या कारवाईला नरसंहार असं अहवालात संबोधलंकाश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यास भारतानं पावलं उचलल्याची कबुली

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मंगळवारी बायडेन प्रशासनात मानवाधिकारांबाबत आपला पहिला अहवाल जाहीर केला. या अहवालात जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य स्थिती परत आणण्यासाठी भारतानं सतत प्रयत्न केले आहेत असं बायडेन प्रशासनानं कबुल केलं आहे. याशिवाय चीनमध्ये उईगर मुस्लीमांवर होत असलेल्या अत्याचारांवरून चीनलादेखील फटकारलं आहे. '2020 Country Reports on Human Rights Practices' या शीर्षकाअंतर्गत अमेरिकेनं हा अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये चीन सरकारला शिनजियांग प्रांतात उईगर मुस्लीमांविरोधात होत असलेल्या नरसंहारासाठी जबाबदार धरणअयात आलं आहे. याशिवाय रशियाच्या सरकारवर विरोधकांवर निशाणा साधणं आणि सीरियाचे नेते बशर अल-असद यांच्यावरही आपल्या लोकांवर अत्याचार करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी हा अहवाल जारी केला. 'जम्मू काश्मीरमध्ये सामान्य स्थिती परत आणण्यासाठी भारत सरकार सातत्यानं पावलं उचलत आलं आहे. सरकारनं दूरसंचार माध्यमांवर लावण्यात आलेला निर्बंध हटवला. तसंच नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या नेत्यांनाही मुक्त केलं,' असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जानेवारी महिन्यात भारत सरकारनं इंटरनेटवर काही प्रमाणात लादलेले निर्बंध मागे घेतले होते.चीनला फटकारलंदुसरीकडे, अहवालात चीनबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनच्या झिनजियांग प्रांतामधील मुस्लिम उईगर मुस्लिम आणि जातीय व धार्मिक अल्पसंख्यक समुहाविरोधात चीनच्या कारवाईस 'नरसंहार' म्हणून घोषित केलं. "शिनजियांग प्रांतात २०२० मध्ये मुख्यत: उईगर मुस्लिम आणि इतर जातीय व धार्मिक अल्पसंख्यक गटांविरूद्ध झालेला नरसंहारा हा मानवतेविरूद्धचा गुन्हा होता, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं अहवलात म्हटलं आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीनJammu Kashmirजम्मू-काश्मीर