मे साई (थायलँड) - थायलँडमधील गुंफेत अडकलेली १३ पैकी सहा मुले येथील बचाव शिबिरापर्यंत पोहोचली असून लवकरच ती बाहेर येतील, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला.उत्तर थायलँडच्या थाम लुआंग गुंफेमध्ये दोन आठवड्यांपासून अडकलेली १२ मुले आणि त्यांचे सहायक फुटबॉल कोच यांना बाहेर काढण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहे. बचाव अभियानाच्या प्रमुखांनी ही माहिती दिली. ‘वाइल्ड बोर्स’नावाची ही फुटबॉल टीम गुंफेमध्ये २३ जूनपासून फसली आहे. हे सर्व जण सरावानंतर तेथे गेले होते आणि मुसळधार पावसानंतर गुंफेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगाचे लक्ष या खेळाडूंकडे लागले आहे. आतील मुले आणि कोच यांना बाहेर काढण्यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत.बचाव अभियानाचे प्रमुख नारोंगसाक असोतानाकोर्न यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही मुले कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहेत. या सर्व मुलांना बाहेर काढण्यासाठी ११ तास लागू शकतात. अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की, जे लोक या अभियानाशी संबंधित नाहीत, त्यांनी या भागातून बाहेर जावे.
गुहेत अडकलेली १३ पैकी सहा मुले सुखरूप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:42 AM