लॉस एंजिल्स : अमेरिकेत दिवस पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या एका छकुलीवर सहा दिवसांची असताना हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. सर्वांत लहान वयात हृदय प्रत्यारोपण करणारी ती पहिली मुलगी ठरली आहे. आॅलिव्हर क्रॉफर्ड असे या चिमुकलीचे नाव असून, अॅरिझोना प्रांतातील फिनिक्स चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. तिचा जन्म सात आठवडे आधी झाला होता. जन्मत:च तिच्या हृदयात दोष होता. हे बाळ वाचण्याची फार कमी शक्यता आहे, असे तिच्या आई-वडिलांना वाटत होते. रुग्णालयाकडून यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात मुलीच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुलीच्या आईचे नाव सेलीन असून, गर्भात असतानानाच हे बाळ वाचण्याची अत्यंत कमी शक्यता असल्याचे डॉक्टरांचे मत होते; पण तरीही हे बाळ या जगात आले, असे तिने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
सहा दिवसांच्या मुलीला नवे हृदय
By admin | Published: February 14, 2015 12:40 AM