काबूल : अफगाणिस्तानमध्ये अज्ञात शस्त्रधाऱ्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सहा भारतीयांचे अपहरण केले आहे. अपहरण करण्यात आलेले सहा जण केईसी( KEC) कंपनीतले कर्मचारी आहेत. अद्याप या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.
स्थानिक टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील बागलान प्रांतातील बाग-ए-शामल गावातून शस्त्रधाऱ्यांनी सहा भारतीय आणि एका अफगाणी कर्मचाऱ्याचं अपहरण केलं आहे. अपहरण कोणी केलं हे अद्याप समोर आलेले नाही. पण या अपहरणामागे तालिबानचा हात असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.
प्रवासादरम्यान बघलान प्रांताची राजधानी पुल-ए-खोमरे शहरातील बाग-ए-शमल या गावातून या सर्वांचं अपहरण करण्यात आलं. अपहरण झालेले नागरिक वीजेची काम करणाऱ्या KEC कंपनीत काम करत होते. या भागातल्या एका इलेक्ट्रिसिटी सबस्टेशनचं कंत्राट या KEC कंपनीकडे आहे.