शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 8:17 PM

Slovakia PM Robert Fico injured in shooting : सध्या पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे वृत्त आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान रॉबर्ट फिको हे जनतेला संबोधित करत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोराने त्यांना मारण्यासाठी अनेक राऊंड फायर केले. सध्या पंतप्रधान रॉबर्ट फिको यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितानुसार, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना ज्या प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या त्याचप्रमाणे स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर एक जण होता की अनेक होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या प्रकृतीबाबत सुद्धा अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, तो हल्लेखोर आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही.

चौथ्यांदा पंतप्रधानपदीस्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी निवडून आले होते. ते 22.94 टक्के मतांनी विजयी झाले होते. स्लोव्हाकियाच्या हितांना प्राधान्य देण्याचे आणि युक्रेनला मिळणारी लष्करी मदत कमी करण्याचे आश्वासन देऊन रॉबर्ट फिको यांनी चौथ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तसेच, रॉबर्ट फिको हे पुतीन यांच्या जवळचे मानले जातात.

पूर्व युरोपमध्ये असलेला देश स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया हा पूर्व युरोपमधील एक देश आहे. हा देश सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. म्हणजेच हा असा देश आहे, ज्याच्या सीमा समुद्राला मिळत नाहीत. या देशाचे क्षेत्रफळ अंदाजे 50 हजार चौरस किलोमीटर आहे. स्लोव्हाकियाच्या पूर्वेस युक्रेन, पश्चिमेस झेक प्रजासत्ताक, उत्तरेस पोलंड आणि दक्षिणेस हंगेरी आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयFiringगोळीबारprime ministerपंतप्रधान