लंडन : सिगारेट सोडायचा निर्णय अनेक वेळा घेतला; पण पुन्हा मोह आवरला नाही, असे ६० पर्यंत झाले असेल तर... त्यांच्यासाठी वयाच्या ६० व्या वर्षीही धूम्रपान सोडले, तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो, असा दावा जर्मन संशोधकांनी केला आहे. धूम्रपान सोडल्यानंतर आरोग्य सुधारून हृदयविकाराचा धोका कमी होण्यास पाच वर्षे लागतात, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. कोणत्याही व्यक्तीने धूम्रपान सोडल्यानंतर आरोग्याला असणारे धोके कमी होण्यास सुरुवात होते. सरासरी धूम्रपान सोडणाऱ्या लोकांचा धोका कधीही धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत १.३ टक्के अधिक असतो. वृद्धावस्थेत होणारा धूम्रपानाचा परिणाम या विषयावर हे तपशीलवार संशोधन करण्यात आले आहे. वृद्ध व्यक्ती जर धूम्रान करीत असतील, तर त्यांना हृदयविकाराचा धोका असतोच; पण ६० व्या वर्षीही धूम्रमान सोडले तर त्यांचे आरोग्य सुधारु शकते, असा दावा जर्मन कर्करोग संशोधन केंद्रातील युटे मॉन्स यांनी केला आहे. हे संशोधन करताना त्यानी २५ व्यक्तींचा वैयक्तिक अभ्यास केला असून, ६० व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ५ लाख लोकांच्या आरोग्याचे तपशील तपासले आहेत. कोणत्याही वयात धूम्रपान सोडल्यानंतर जितका अधिक काळ जाईल तितका त्या व्यक्तीला असणारा हृदयविकाराचा धोका कमी होत जातो. शेवटची सिगारेट ओढल्यानंतर, पहिल्या पाच वर्षांत हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.(वृत्तसंस्था)४धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात एकूण किती सिगारेट ओढल्या यावरही धोक्याची तीव्रता कमी-अधिक होऊ शकते. धूम्रपान सोडणाऱ्या व्यक्तीने पूर्वायुष्यात जास्त सिगारेट ओढल्या असतील तर धोक्याची तीव्रता नक्कीच जास्त असते; पण धूम्रपन सोडल्यानंतर हा धोकाही कमी होऊ लागतो. ४धूम्रपानाची सवय पूर्वायुष्यात लागते आणि ती सोडणे जमत नाही; पण साठपर्यंत आल्यानंतर धूम्रपान सोडण्याची इच्छा होते, अशा व्यक्तींसाठी मॉन्स यांनी हा अभ्यास केला आहे.
६० व्या वर्षीही धूम्रपान सोडणे लाभदायक
By admin | Published: April 26, 2015 1:51 AM