ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 11 - तुम्हाला घरात धुम्रपान किंवा स्मोकिंग करण्याची सवय असेल आणि जर तुमच्या घरात कोणी लहान मुल असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार घरात धुम्रपान केल्याने लहान मुलं आजारी पडतात ज्यामुळे त्यांना वारंवार रुग्णालय किंवा दवाखान्याच्या फे-या माराव्या लागतात.
'आम्ही केलेल्या संशोधनात घरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचा वापर होत असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचं', अॅशली मेरिअनोस यांनी सांगितलं आहे. नॅशनल सर्व्हे ऑफ चिल्ड्र्न हेल्थ 2011-12 ची पाहणी केली असता हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये नुकत्याच जन्मलेल्यांपासून ते 17 वर्षाच्या मुलांवर सर्व्हे करण्यात आला होता.
24 टक्के मुलांचे कुटुंबिय घरातच धुम्रपान करत असल्याचं समोर आलं होतं. ज्यांच्या घरात धुम्रपान केलं जात नाही त्यांच्याशी तुलना करता इतर मुलांचं डॉक्टरांकडे जाण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं.