लंडन : सेलफोन जगतासाठी आजचा दिवस वाईट आहे. ‘मोबाईल नेटवर्क्स’द्वारे संदेश पाठविण्याची पद्धत विकसित करण्यास हातभार लावणारे मॅट्टी मॅक्कोनेन यांचे आजारामुळे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. एसएमएसचे जनक म्हणून जगभर ओळखले जात असूनही एसएमएस तंत्रज्ञान विकसित करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनी कधीही स्वत:कडे घेतले नाही. एसएमएस तंत्रज्ञान विकासाचा विषय निघताच हे तंत्रज्ञान आपण एकट्याने विकसित केले नसल्याचे ते त्वरित स्पष्ट करत. मोबाईल फोनद्वारे लिखित संदेश पाठविण्याची कल्पना त्यांनी सर्वप्रथम १९८४ मध्ये मांडली होती. एखाद्या विशिष्ट प्रकारात संदेश पाठविण्याची पद्धत नेहमीसाठी अस्तित्वात राहील, असे मला वाटते. एसएमएसचा विकास ही संयुक्त प्रयत्नांची फलनिष्पत्ती आहे, असे आपण मानतो. (वृत्तसंस्था)
एसएमएसचे जनक मॅट्टी मॅक्कोनेन कालवश
By admin | Published: July 01, 2015 2:46 AM