वॉशिंग्टन : अमेरिकेत पूर्व भागात हिमवर्षावाच्या शक्यतेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगामी दोन दिवसात प्रचंड वाऱ्यांसह हिमवर्षाव होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राजधानीसह आसपासच्या भागात उद्यापर्यंत किमान ६० सेंमीपर्यंत बर्फ साठू शकतो. वादळी वाऱ्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद केली जाऊ शकते. अमेरिकेत न्यूयॉर्कनंतर वॉशिंंग्टन, मेरीलँड आणि वर्जिनिया येथे दरदिवशी किमान ७ लाख प्रवासी प्रवास करतात. (वृत्तसंस्था)
अमेरिकेत हिमवर्षावाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2016 3:26 AM