ऑनलाइन लोकमतहार्बिन, दि. 04 - चीनच्या हार्बिन शहरात 2017 चा आंतरराष्ट्रीय स्नो फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या स्नो फेस्टिव्हलची सुरुवात गुरुवार (दि. 5) पासून होणार असून, फेब्रुवारीत संपणार आहे. दरम्यान, या फेस्टिव्हलमध्ये बर्फाने साकारलेले उंच राजवाडे आणि विवध शिल्पकृतींचे आकर्षण ठरणार आहे.
शिल्पकलाकारांनी बर्फाच्या कलाकृतींना शेवटचा हा त फिरवला आहे. या फेस्टिव्हलमध्ये भव्य राजवाडे, इमारती आणि काही शिल्पकृती या पूर्णपणे बर्फाने साकारलेल्या असतात. तसेच बर्फांच्या शिल्पांना रोषणाईचा मुलामा देण्यात आला आहे. या ठिकाणी जणू एक बर्फाचं संपूर्ण शहर वसलेलं असतं. तसेच येथील तापमान उणे 35 सेल्सिअस इतके आहे.
दरम्यान, स्नो फेस्टिव्हलची मजा लुटण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशातील आणि विदेशातील पर्यटक चीनमध्ये येतात आणि या फेस्टिव्हलचा थंडा थंडा कूल कूल अनुभव घेऊन जातात.