वाशिंग्टन - इराणबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेशी पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधला. इराणने लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात एकही अमेरिकी सैनिक जखमी नसल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. यावेळी बोलताना, इराणचा लष्करी अधिकारी सुलेमानी यास ठार मारल्यामुळे मला मी नोबेल पारितोषिकासाठी पात्र आहे. मला शांततेचं नोबेल मिळायला हवं, असेही ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकन नागरिकांना धोका होता म्हणून सुलेमानींना मारलं. तसेच इराणने केलेल्या हल्यात अमेरिकेच्या सैनिकी तळाचं नुकसान झालं आहे. मात्र सर्व अमेरिकन सैनिक सुरक्षित असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी दिली. इराणला आम्ही अण्वस्त्र तयार करु देणार नसल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराणने जर अण्वस्त्र निर्मिती केल्यास आर्थिक निर्बंध आणू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. तसेच, इराणविरोधात युरोपीय देशांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी याला अमेरिकेने ठार केल्यामुळे हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारातही उपस्थित केला जात आहे. सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेला वाचवलं आहे. त्यामुळे शांततेच्या नोबेलसाठी माझी निवड केली पाहिजे. या पुरस्कारासाठी मी पात्र आहे, असं ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.दरम्यान, इराणच्या लष्करप्रमुखाला ठार मारण्याचा आदेश दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्या देशाबरोबर युद्ध करण्यास मनाई करणारे मतदान डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज करणार आहेत, असे सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी सांगितलंय.