"....तर अवघ्या ३० मिनटांत रशिया अमेरिका आणि युरोपचं नामोनिशाण मिटवेल", Elon Musk यांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 11:16 AM2022-10-15T11:16:46+5:302022-10-15T11:18:08+5:30
Elon Musk : रशियाकडे असलेल्या आण्विक शक्तीबाबत मस्क यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ट्विटरवर अॅलेक्स नावाच्या व्यक्तीसोबत चर्चा करताना मस्क यांनी रशियाच्या आण्विक शक्तीबाबत हे विधान केले आहे.
वॉशिंग्टन - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अॅलन मस्क हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मस्क यांनी हल्लीच रशिया-युक्रेन आणि चीन-तैवान संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र आता रशियाकडे असलेल्या आण्विक शक्तीबाबत मस्क यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ट्विटरवर अॅलेक्स नावाच्या व्यक्तीसोबत चर्चा करताना मस्क यांनी रशियाच्या आण्विक शक्तीबाबत हे विधान केले आहे.
ट्विटरवर मस्क म्हणाले की, निश्चितपणे कुणीही समजुतदार व्यक्तीही अणुयुद्ध व्हावे असे इच्छिणार नाही. मात्र आम्ही समजुतदार लोकांसोबत वावरलो असतो तर जगात कुठेही कधीही युद्ध झाले नसते. आजच्या घडीला रशियाकडे ३० मिनिटांच्या आत अमेरिका आणि युरोपला आण्विक क्षेपणास्त्रांनी नष्ट करण्याची क्षमचता आहे. अमेरिका आणि युरोपकडेही अशीच आण्विक क्षमता आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे ही गोष्ट बहुताश लोकांना माहिती नाही, असे ते म्हणाले.
अण्वस्रांचा वापर करणे हा वेडेपणा ठरेल. मात्र या स्थितीत असणे हाही वेडेपणाच आहे, असेही त्यांनी सांगितले. नाटोने सोमवारपासून अण्वस्त्रांची चाचणी करण्याची तयारी केल्याचे वृत्त आले असतानाच मस्क यांनी हे विधान केले आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हल्लीच कझाकिस्तानची राजस्थानी अस्ताना येते आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनसोबतच्या युद्धाबाबत कुठल्याही प्रकारचा पश्चात्ताप नसल्याचे सांगितले. तसेच जर नाटो देशांच्या सैन्याने युक्रेनच्या बाजूने युद्धात कुठल्याही बाजूने प्रवेश केला तर जागतिक विध्वंस निश्चित असल्याचे सांगितले.