न्यूयॉर्क - एका पतीने त्याच्या पत्नीसाठी नवा जोडीदार शोधण्यासाठी मदत केल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीने लिहिलेल्या पुस्तकामधून याबाबतची माहिती दिली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार या पतीला त्याच्या मृत्यूचा अंदाज आला होता. त्याला एक गंभीर आजार झाला होता. पत्नीने या घटनेचा उलगडा 'Find a Place for Me' नावाच्या पुस्तकातून केला आहे. पुस्तकाच्या प्रमोशनदरम्यान तिने माजी पती आणि सध्याच्या पतीसोबतच्या नात्याबाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
डिए़ड्रे फगन नावाच्या महिलेने सांगितले की, तिचा माजी पती बॉब याला आजाराबाबत माहिती मिळाली होती. तेव्हा डॉक्टरांनी तो केवळ एक वर्ष जगेल असे सांगितले होते. बॉबल एमायोट्रोफिक लेटरल स्क्लेरोसिस नावाचा आजार झाला होता. या आजारामुळे ब्रेन आणि स्पाइन स्पायनल कॉर्डच्या सेल्स प्रभावित होतात. आजाराचे निदान झाले तेव्हा त्याचे वय केवळ ४३ वर्षे होते.
२०११ मध्ये जेव्हा बॉब याला जीवघेणा आजार झाला तेव्हा त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली होती. बॉबला झालेल्या आजारामुळे फगन पूर्णपणे कोलमडली होती. तेव्हा बॉबने फगनला सांगितलं की, तुझी इच्छा असेल तर तू नव्याने कुठल्या तरी व्यक्तीवर प्रेम कर. माझ्यासोबतच्या नात्यामध्ये तू खूश होतीस. त्यामुळे माझी इच्छा आहे की, मुले आणि स्वत:साठी पुन्हा एकदा प्रेमाने सुरुवात करावी.
दरम्यान, बॉबच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर सुमारे चार महिन्यांनंतर फगनचा सहकारी डेव्ह घरी आला. डेव्ह आणि मी एकाच विद्यापीठामध्ये शिकत होते, असे फगन सांगते. आमचे खूप कॉमन फ्रेंड होते. मात्र दोघेही एकमेकांना फार ओळखत नव्हतो. नंतर डेव्हचं फगनच्या घरी येणंजाणं वाढलं. फगनच्या पतीशीही त्याची ओळख झाली. तिघांमध्ये चांगली मैत्री झाली. २०१२ मध्ये जेव्हा बॉबचा मृत्यू झाला तेव्हा डेव्ह तिथेच होता.
बॉबच्या मृत्यूनंतर फगन कोलमडली होती. त्याकाळात डेव्ह यांनी कुटुंबाला आधार दिला. तसेच त्यांना धीर दिला. त्यानंतर फगन आणि डेव्ह यांनी लग्न केले. दोघांच्याही लग्नाला आता सात वर्षे झाली आहेत. फगन सांगते की बॉब तिचं पहिलं प्रेम होता, तर डेव्ह हा दुसरं खरं प्रेम आहे.