ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 18 - मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा भाग बनला आहे. म्हणजे एखाद्या दिवशी जर मोबाईल घरी विरसलो किंवा मोबाईल सोबत नसेल तर आपण जगापासून दूर आहोत असा भास होऊ लागतो. एखाद्या पर्यटनस्थळी किंवा कार्यक्रमाला हजेरी लावली, तर मित्रांशी गप्पा कमी मारल्या जातात आणि फोटो जास्त काढले जातात. मी त्या ठिकाणी उपस्थित होतो किंवा आम्ही मस्त एन्जॉय केलं हे सांगण्याची घाई इतकी असते की ते फोटो काढून लगेच सोशल मिडियावर अपलोडही केले जातात. बर इतकंच नाही तर त्यावर कमेंट, लाईक नाही मिळाले तर होणारी चिडचिड वेगळीच. त्यामुळेच की काय तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या आजच्या या पिढीला जगण्याचा खरा अर्थ सांगणारा हा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे.
बोस्टन ग्लोबचे छायाचित्रकार जॉन ब्लँडिंग यांनी काढलेला हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या जॉनी डेप यांच्या ‘ब्लॅक मास’ चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी हा फोटो काढण्यात आला आहे. ब्रुकलिनच्या मॅसॅच्युऐटस येथे हा प्रिमिअर पार पडणार होता. त्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. फोटोमध्ये तुम्ही पाहिलंत तर वृद्द महिला सोडल्यास जमलेले सर्व लोक मोबाईल हातात घेऊन फोटो काढत आहेत. कदाचित आपण तिथे असतो तर आपणही तेच केले असते. याउलट आजींना यात काही रस नाही. त्या ख-या अर्थांने त्या क्षणाचा आनंद घेत, सर्व आठवणी डोळ्यांच्या कॅमे-यात साठवताना दिसत आहेत.
आताची पिढी जितकी तंत्रज्ञानाच्या आहारी गेली आहे. याउलट जुन्या पिढीला तंत्रज्ञानाची तितकी जाणही नाही आणि रसही. त्यामुळे लोक सोशल मिडिया नाही तर ख-या अर्थाने जोडणं त्यांना जमत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. एखादी घटना किंवा क्षण ख-या अर्थाने जगा हेट हा फोटो शिकवत आहे. जॉन ब्लँडिंग यांनी हा फोटो ट्विटवर टाकला असून प्रचंड लोकप्रिय होत आहे. या फोटोला 14 हजार जणांनी रिट्विट केले आहे.
this is my new favorite photo of all time pic.twitter.com/v8Qs6TeXZf— Wayne Dahlberg (@waynedahlberg) September 26, 2015