आजपासून जवळपास 500 वर्षांपूर्वी पृथ्वीवर महाविनाशकारी सौर वादळ (Solar storm) आले होते. पृथ्वीच्या उत्तरेकडील आकाशात तीन रात्री आग (Fire in Sky) आणि आगच ओकत असल्याचे दिसत होते. आकाशात पाहिले की आगीकडे पाहिल्यासारखे भासत होते. असा प्रकार आधी कधीही पाहिला नव्हता. परंतू पृथ्वीवर पुन्हा एकदा अशाप्रकारचे महावादळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Solar storm will hit earth in current century, Scientist warning)
वैज्ञानिकांनुसार या शतकात अंतराळातून पुन्हा एकदा असे सौर वादळ पृथ्वीवर येण्याचा धोका आहे. सुर्याच्या पृष्ठभागावर होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील स्फोटांचा परिणाम संपूर्ण सौरमंडळावर पहायला मिळणार आहे. याचा पृथ्वीवरदेखील विनाशकारी परिणाम होऊ शकतो. असे झाल्यास पृथ्वीवरील वीज नष्ट होऊन जाईल. 1989 मध्ये कॅनडामध्ये सौर वादळामुळे क्युबेक शहराची वीज 12 तासांसाठी गेली होती. त्या आधीचे सौर वादळ हे 1859 मध्ये आले होते. तेव्हा अमेरिका आणि युरोपचे टेलिग्राफचे नेटवर्क उद्ध्वस्त झाले होते. सध्या जगात कॉम्प्युटर, मोबाईल आदी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. यामुळे या वादळाचे परिणाम भयानक असण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
1582 मध्ये काय झालेले?1582 मध्ये आलेल्या सौर वादळामुळे लोकांना वाटलेले की आता पृथ्वी नष्ट होणार आहे. तेव्हाचे पोर्तुगिज लेखक पेरे रुइज सोआरेस यांनि लिहिले आहे की, उत्तरेच्या आकाशात तीन रात्री आग आणि आगच दिसत होती. मध्यरात्री किल्ल्याच्या वर आलेली सुर्याची किरणे खूप भयावह होती. दुसऱ्या दिवशीही याच वेळी तसेच घडले. यानंतर असा प्रकार जपान, जर्मनी, दक्षिण कोरियासह अन्य देशांमध्येही घडल्याचे समोर आले.
सौर प्रणालीवर काम करणारे वैज्ञानिक आता मागच्या घटनांची तपासणी करत आहेत. भविष्यात येणारे सौर वादळ आधीच समजले तर त्यावर काहीतरी उपाय योजता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे. येत्या 79 वर्षांमध्ये कधीही ही आगीच्या तीव्रतेची किरणे पृथ्वीवर आदळू शकतात असा इशारा त्यांनी दिला आहे. सौर चक्र 25 गेल्या वर्षीच सुरु झाले आहे. यामुळे सूर्य 2025 मध्ये आपल्या उच्चांकी तापमानावर असणार आहे.