सोमालियातील किसमायो शहरातील एका हॉटेलमध्ये कार बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 47 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वृत्तसंस्थेनुसार, रविवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये स्फोट करून गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये हॉटेलमध्ये आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी हॉटेल परिसराला वेढा घातला आणि सर्व हल्लेखोरांना ठार केले. मात्र, या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 47 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या वर्षी ऑगस्टमध्येही या दहशतवादी संघटनेने सोमालियातील मोगादिशू येथील हॉटेल हयातवर हल्ला केला होता. ज्यामध्ये अनेक अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते.