हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. काही प्राण्यांना वयच नसते. उदाहरणच द्यायचे म्हटले, तर जेलीफिश आहे. अर्थात याला फॉक्स ओ जनुक कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. अमेरिकन लॉबस्टर हा किटकांच्या जातीतील छोटा जीव. याचे वैशिष्ट्य म्हणजे नष्ट होत चाललेला अवयव यांना पुन्हा प्राप्त होतो. समुद्रातील माशांच्या जातीच्या अशाच एका प्राण्याचे वय ५०७ वर्षे असल्याचे समोर आले आहे. या प्राण्यांना निसर्गानेच दिलेली ही देणगी आहे.
काही प्राण्यांना वयच नसते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 2:05 AM