Coronavirus : कोरोनाने मृत्यू झालेल्या पतीने नोटमध्ये लिहिलं असं काही; पत्नीला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 8:45 PM
Coronavirus : भविष्यात तुला कोणी आवडलं तसेच मुलांनी ती व्यक्ती आवडली तर स्वत:ला थांबवू नकोस, असं जॉनने पुढे नोटमध्ये लिहिलं आहे.
ठळक मुद्देकेटी माझ्या आयुष्यात भेटलेली सर्वात सुंदर, काळजी करणारी आणि उत्तम व्यक्ती आहे. ती एकमेव आहे. मार्च महिन्यामध्ये जॉनला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने स्वत:ला घरामध्येच क्वारंटाइन केले.
संपूर्ण जगात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहेत. कनेटकट राज्यात अलीकडेच जॉनथन जॉन कोएलो यांचा कोरोनावर उपचार घेत असताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मागच्या महिन्यापासून उपचार घेत असणाऱ्या जॉनची पत्नी रुग्णालयामध्ये पोहचण्याआधीच हार्ट अटॅकच्या तीव्र झटक्याने जॉन यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचे सामान आवरताना पत्नीला अशी काय गोष्ट सापडली की, तिला अश्रू अनावर झाले. जॉनच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
जॉनची पत्नी केटी ही ब्रेडीन आणि पेनी या आपल्या मुलांबरोबर घरी आल्यानंतर जॉनथनच्या सामानाची आवराआवर करत होती. त्यावेळी तिला जॉनथनचा फोन सापडला. या फोनमध्ये त्याने आपल्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी शेवटचा भावविवश नोट लिहून ठेवली होती. जॉनला काही गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळीच त्याने पत्नी आणि मुलांसाठी ही नोट लिहून ठेवली होती. माझे तुमच्यावर मनापासून खूप प्रेम आहे. तुम्ही मला एक सुंदर जीवन जगण्याची संधी दिलीत. याहून अधिक मी काही मागूच शकलो नसतो. मी तुझा पती आणि ब्रेडीन व पेनीचा वडील आहे याचा मला खूप अभिमान आहे, असे या फोनमधील नोटमध्ये जॉनने लिहिले आहे. जॉनने लिहून ठेवलेला हा मेसेज वाचताना पत्नीला अश्रू अनावर झाले.जॉन पुढे लिहतो की, केटी माझ्या आयुष्यात भेटलेली सर्वात सुंदर, काळजी वाहणारी आणि उत्तम व्यक्ती आहे. ती एकमेव आहे. केटी ही मुलांची ज्या पद्धतीने काळजी घेते ते पाहून मला खूप आनंद होतो. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव आहे. या मेसेजच्या अखेरीस जॉनने केटीला पुन्हा लग्नाचा विचार करण्याचा सल्लाही दिला आहे. भविष्यात तुला कोणी आवडलं तसेच मुलांनी ती व्यक्ती आवडली तर स्वत:ला थांबवू नकोस, असं जॉनने पुढे नोटमध्ये लिहिलं आहे.
कॉलेजमध्ये असल्यापासून जॉन आणि केटी यांच्यात प्रेम होते असे या दोघांच्या नजीकच्या मित्रांकडून सांगण्यात आले. कॉलेजमध्येच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर २०१३ साली ते विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नानंतर त्यांना झालेलं पहिल्या बाळालाच म्हणजेच ब्रेडनला न्यूरोलॉजिकल आजार असल्याचे निदान झाले. तरीदेखील ब्रेडन त्यातून सुखरूप वाचला. जॉन हा येथील स्थानिक न्यायलयामध्ये काम करत असे. घरामध्ये तो एकटा कमावता व्यक्ती होता. मार्च महिन्यामध्ये जॉनला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने स्वत:ला घरामध्येच क्वारंटाइन केले. मात्र त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लगाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला रुग्णालयामध्ये दाखल करुन त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले. त्यानंतर जॉनच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत होती. तो पूर्णपणे बरा होईल असं डॉक्टरांनाही वाटत होतं. मात्र काही तासांमध्येच त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.