शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 8:36 AM

काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना आज पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : वनप्लस या चीनच्या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने यंदाचे फ्लॅगशिप हँडसेट OnePlus 8  आणि OnePlus 8 Pro लाँच केले आहेत. काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना आज पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

कमी कालावधीतच चीनच्या OnePlus या प्रिमिअम स्मार्टफोन कंपनीने सॅमसंग, अॅपलला टक्कर दिली आहे. मात्र, या कंपनीचे फोन 35 ते 50 हजाराच्या रेंजमध्ये उपलब्ध असल्याने सामान्य ग्राहकांना परवडणारे नव्हते. यामुळे वनप्लसने कमी किंमतीचा फोन भारतीय बाजारासह जगभरात उतरविण्याचे ठरविले आहे. यानुसार OnePlus Z हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. 

कंपनीने या फोनची अधिकृत माहिती दिलेली नसली तरीही वनप्लसचे सह संस्थापक कार्ल पे यांनी ट्विटकरून या डिव्हाईसचे संकेत दिले होते. या ट्विटवरून नव्या OnePlus Z च्या किंमतीचा अंदाज येत आहे. ट्वीटनुसार 299 डॉलर (22,799 रुपये) या फोनची किंमत असणार आहे. हा फोन जुलैमध्ये लाँच केला जाऊ शकतो. 

आज लाऊ यांनी वनप्लसच्या पारंपरिक पांढऱ्या लोगोऐवजी एक निळ्या रांगात वनप्लसचा लोगो वापरला आहे. कदाचित कमी किंमतीतला वनप्लस Z/OnePlus Nord स्मार्टफोन असू शकतो. किंवा कंपनी वनप्लस 8 सिरीज किंवा वनप्लस बुलेट वायरलेस झेड चे निळे व्हेरिअंट लाँच केले जाऊ शकते. 

वनप्लसचे सहसंस्थापक कार्ल पेई हे देखील #NewBeginnings हॅशटॅगने सारखे ट्विट करत आहेत. तसेच 'rock the boat again' ही टॅगलाईनही वापरत आहेत. एवढा सारा प्रचार हा एखाद्या स्मार्टफोनसाठीच असून शकतो. 

वनप्लस झेडमध्ये काय काय? वनप्लस झेडबाबत गेल्या काही काळापासून वातावरण तापलेले आहे. अनेक जण अनेक प्रकारच्या शक्यता व्यक्त करत आहेत. हा हँडसेट जुलैमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 90 HZ ची ओएलईडी स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 765 चिपसेट, 30 वॉट चार्जिंग आणि क्वाड कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. या वनप्लस झेडची किंमत 24000 पेक्षा कमी असण्याची शक्यता असून 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये 4300एमएएचची बॅटरी असणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

India China FaceOff: हाय रे दैवा! 'मेड इन चायना' बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच चीनसोबत लढणार?

India China Face Off: चीनी सैनिकांची खैर नाही! भारताचे सर्वात खतरनाक पहाडी योद्धे तैनात

फुरफुरणाऱ्या नेपाळची पुरती जिरली; चीनने अख्खी गावेच घशात घातली

शक्तीहीन कोरोना! "वाघाचा जंगली मांजर बनला"; मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा दावा

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलchinaचीन