बीजिंग : चीनने रविवारी जगातील सगळ््यात मोठ्या व प्रचंड आकाराच्या रेडिओ दुर्बीणचा वापर सुरू केला. फुटबॉलची ३० मैदाने एकत्र केल्यावर जेवढा आकार होईल तेवढी ही दुर्बीण असून ती ४,४५० परावर्तक आरशांपासून (रिफ्लेक्टर पॅनेल्स) बनलेली आहे. या विश्वाचा जन्म वा उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध घेण्यास ही दुर्बीण मदत करील.चीनच्या अकॅडमी आॅफ सायन्सेस अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल अॅस्ट्रॉनोमिकल आॅब्झर्वेशनचे उप प्रमुख झेंग शिओनियन यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले येते १० ते २० वर्षे ही दुर्बीण जागतिक नेतृत्व करील. या दुर्बिणीचा वापर अधिकृतपणे सुरू केला जात असताना शेकडो खगोलशास्त्रज्ञ आणि आकाशातील घटनांची उत्सुकतेने माहिती घेऊ इच्छिणारे उपस्थित होते. गुईझोऊ प्रांतातील पिंगटॅँग परगण्यातील कार्स्ट खोऱ्यात ही दुर्बीण आहे. हा दुर्बीण प्रकल्प २०११ मध्ये सुरू झाला व त्यासाठी १.२ अब्ज युआन (१८० दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च आला. आठ हजार लोकांनी बनविले आश्चर्य!चीनच्या खगोलशास्त्रज्ञांनी १७ वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. या दुर्बिणीसाठी शांत वातावरणाची आवश्यकता असल्यामुळे सुमारे आठ हजार लोकांना त्या भागातून हलविण्यात आले. दुर्बिणीला पाच किलोमीटर त्रिज्येत रेडिओ सायलेन्सची गरज असते. ज्या आठ हजार लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणांहून हलवावे लागले त्यांच्या निवासासाठी तेथून दहा किलोमीटरवर दोन वसाहतींत ६०० पेक्षा जास्त संकुलांची उभारणी करावी लागली.
३० फुटबॉल मैदानांएवढी चीनची महादुर्बीण अखेर कार्यरत
By admin | Published: September 26, 2016 12:33 AM