अमेरिका स्थित लिलावगृह ‘सोथबीज’ जगातील आतापर्यंतच्या सर्वात जुन्या व्हिस्कीचा लिलाव करीत आहे. या ८१ वर्षीय व्हिस्कीचे नाव ‘द मॅकलन द रीच’ आहे.
सोथबीजने या व्हिस्कीचे काही फोटोही शेअर केले आहेत. सोथबीजच्या वेबसाइटवर जाऊन या व्हिस्कीसाठी बोली लावता येणार आहे. बोली लावण्यासाठी ५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. व्हिस्की प्रेमींसाठी, ‘द मॅकलन द रीच’ ची अंदाजे किंमत ९६.७२ लाख ते १.७५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
‘द मॅकलन’ १९४० मध्ये डिस्टिल्ड करण्यात आले आणि या व्हिस्कीची फक्त एक बाटली तयार केली गेली. ही अत्यंत रीच, गोड आणि स्मोकी फिनिशसह ४१.६ टक्के अल्कोहोलच्या मात्रेत येते. विजेत्या बोली लावणाऱ्याला ‘द मॅकलन द रीच’ च्या बाटलीसह एक लहान मूर्तीही मिळेल. जगात सर्वाधिक विक्री होणारे १० पैकी ७ व्हिस्की ब्रँड भारतीय आहेत.