संपूर्ण जगात दहशत निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिअंटसंदर्भात एका ब्रिटीश शास्त्रज्ञाने मोठा दावा केला आहे. त्यांचे औषध सॉट्रोविमॅब (Sotrovimab) हे ओमायक्रॉनच्या प्रत्येक म्यूटेशनवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्याचे म्हणण्यात आले आहे. हे औषध ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके)ने यूएस पार्टनर वीर (व्हीआयआर) बायोटेक्नोलॉजीसोबत एकत्रितपणे तयार केले आहे. आता हे औषध ओमाक्रॉन व्हेरिअंटवर प्रभावी असल्याचे मानले जाते.
जारी केलेल्या निवेदनात, कंपनीने दावा केला आहे की त्यांचे औषध सॉट्रोविमॅब ओमायक्रॉनच्या 37 म्यूटेशन्सविरोधात प्रभावी ठरले आहे. गेल्या आठवड्यातही, प्री-क्लिनिकल चाचण्यांनंतर, सांगण्यात आले होते की, सोट्रोविमॅब औषध ओमायक्रॉन विरोधात काम करते. याच बरोबर कंपनीने जोर देऊन सांगितले, की हे औषध WHO ने नमूद केलेल्या प्रत्येक व्हेरिअंटवर प्रभावीपणे काम करते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे हे औषध म्हणजे एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. हे औषध मानवाने आधीच तयार केलेल्या नैसर्गिक अँटीबॉडीवर आधारलेले आहे. यामुळे हे इतर औषधींपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. खरे तर कंपनीच्या या दाव्याने संपूर्ण जगाला एक आशेचा किरण नक्कीच दाखवला आहे. मात्र, आतापर्यंत या औषधाचे जे परिणाम समोर आले आहेत, ते कुठल्याही मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेले नाहीत. यामुळे, या औषधाची औपचारीक घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
रिसर्चमध्ये समोर आली अशी माहिती - कंपनीने म्हटले आहे, की सॉट्रोविमॅब औषधानंतर हॉस्पिटलायझेशन बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कमी केले जाऊ शकते. सुरुवातीच्या टेस्टनंतर म्हणण्यात आले आहे, की हॉस्पिटलायझेशन 79 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच याच औषधामुळे जो व्हायरस तयार होतो, तो ह्यूमन सेल्समध्ये जाऊ शकत नाही आणि माणवाच्या जीवाला धोका निर्माण होत नाही.