नवी दिल्ली: संपूर्ण जगावर अद्यापही कोरोना संकटाचं सावट कायम आहे. अनेक देशांत लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र तरीही लसीकरण पूर्ण होण्यास अनेक महिने लागू शकतात. त्यातच कोरोना विषाणूत होणारे बदल आव्हानात्मक ठरत आहेत. या नव्या स्ट्रेनमुळे वैद्यकीय संशोधकांसमोर नवं आव्हान उभं राहत आहे. ब्रिटन पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार संशोधकांची चिंता वाढवणारा ठरला आहे. (South Africa asks Serum Institute to take back corona vaccine doses)भारताचा जगात डंका! १०० देशांना कोरोना लस पाठवणार पुण्याची सीरम इन्स्टिट्यूटदक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा फटका सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute) तयार केलेल्या कोरोना लसीला बसला आहे. सीरमची ऍस्ट्राझेनेका कोविड लस वापरण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेनं घेतला होता. मात्र आता दक्षिण आफ्रिकेनं आपला निर्णय बदलला आहे. तुम्ही पाठवलेले कोरोना लसीचे १० लाख डोज परत घ्या, अशी सूचना दक्षिण आफ्रिकेनं सीरमला केली आहे. लहान बाळांनाही देता येणार कोरोना प्रतिबंधात्मक लस; ऑक्टोबरपर्यंत विकसित होणार : सीरमसीरमनं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कोरोना लसीचे १० लाख डोज पाठवले होते. मात्र आता दक्षिण आफ्रिकेनं सीरमची लस न वापरण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे. लसींच्या उत्पादनांच्या बाबतीत सीरम जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरमनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोरोनावरील लस तयार केली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनंदेखील सीरमच्या लसीच्या वापरास हिरवा कंदिल दिला आहे.सीरमकडून पुढील काही आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेला कोरोना लसीच्या ५ लाख डोजचा पुरवठा केला जाणार होता. मात्र आता दक्षिण आफ्रिकेत सीरमच्या लसीचा वापर बराच लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबद्दल रॉयटर्सनं सीरमची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कंपनीनं यावर लगेच भाष्य करणं टाळलं. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. यापासून संरक्षण देण्यात सीरमची लस पूर्णपणे यशस्वी ठरत नाही. या विषाणूवर सीरमची लस वापरली गेल्यास मिळणारं संरक्षण अतिशय कमी असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.
जगानं सीरमच्या लशीला स्वीकारले, पण 'या' देशानं नाकारले; १० लाख डोज परत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 8:19 AM