वॉशिंग्टन : वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातील आक्रमक वर्तनावरून ‘परिणाम’ भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेने चीनला दिला. या विभागातील शेजारी काळजीत पडतील अशा वर्तनापासून दूर राहण्याचा सल्ला अध्यक्ष बराक ओबामा यांनी चीनला दिला. अमेरिका आज सत्तेच्या ज्या पायरीवर पोहोचला आहे तो संयम पाळल्यामुळे हे मला अध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगायचे आहे, असे ओबामा म्हणाले. मला वाटते की दीर्घ कालावधीचा विचार केला तर ते चीनच्याही हिताचे असेल, असे ओबामा सीएनएन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. जी-२० देशांच्या शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी ही मुलाखत घेण्यात आली होती. (वृत्तसंस्था)>दहा जहाजे तैनातदक्षिण चीन समुद्राजवळ मोठ्या संख्येने चिनी जहाजांची वर्दळ वाढल्याचे गेल्या आठवड्यात दिसले. फिलिपाईन्सच्या किनाऱ्यापासून ही जहाजे जवळ आहेत. या समुद्रापासून चीनने दूर राहावे, असा इशारा अमेरिकेने दिला होता.
दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेचा ड्रॅगनला इशारा
By admin | Published: September 06, 2016 4:06 AM